Wednesday, 24 February 2016
Friday, 19 February 2016
खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलततीचे वाढीव २५ गुण प्रस्ताव
शासन निर्णय क्र. एसएससी-२०१२/(१५४/१२)/उमाशी-२
दि. २१ एप्रिल, २०१५ अन्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.१० वी ) व उच्च
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.१२ वी ) परिक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य,
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी व प्राविण्य प्राप्त सर्व खेळाडूंना
क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येणार आहेत.
भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय
क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, केंद्र शासन मान्यता प्राप्त खेळ, महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळ, भारतीय ऑलिंपिक व महाराष्ट्र ऑलिंपिक
असोसिएशनची संलग्नता असलेले एकविध खेळाच्या राज्य संघटनांमार्फत आयोजित खेळ क्रीडा
गुणांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. सदर क्रीडा स्पर्धा आयोजनाचा कालावधी ०१ जून ते
२८/२९ फेब्रुवारी असावा. तसेच एकविध खेळ क्रीडा संघटनांच्या १४ वर्षावरील क्रीडा
स्पर्धेत सहभागी/प्राविण्य प्राप्त खेळाडूंना सवलतीचे गुण देण्यात येतील; खुल्या
गटातील क्रीडा स्पर्धा याकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
शासन निर्णयान्वये
खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण पूढील प्रमाणे देण्यात येतील :
१.
|
क्रीडा विभाग (शालेय/ग्रामीण/महिला/इतर
क्रीडा स्पर्धा) व एकविध खेळाच्या संघटनेच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा
स्पर्धेत सहभागी झालेल्या व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य
प्राप्त खेळाडूं विद्यार्थ्यांना २५ गुण देण्यात येणार आहेत.
|
२.
|
क्रीडा विभाग
(शालेय/ग्रामीण/महिला/इतर स्पर्धा) व एकविध खेळाच्या संघटनेमार्फत आयोजित
करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या व राज्यस्तर
क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना २० गुण देण्यात
येणार आहेत.
|
३.
|
क्रीडा विभाग
(शालेय/ग्रामीण/महिला/इतर स्पर्धा) व एकविध खेळाच्या संघटनेमार्फत आयोजित
करण्यात आलेल्या राज्यस्तर क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू
विद्यार्थ्यांना १५ गुण देण्यात येणार आहेत.
|
तरी संबंधित शाळा / महाविद्यालयांनी
आपल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा क्रीडा सवलत गुणांचा परिपूर्ण प्रस्ताव
(अर्ज,खेळाडूचे प्रमाणपत्र व रिसीट सत्यप्रत) दोन प्रतित कार्यालयात शनिवार
दिनांक २७ फेब्रुवारी, २०१६ पूर्वी सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी
कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ क्रमांकावर व sataradso.blogspot.in वर
संपर्क साधावा.
Subscribe to:
Posts (Atom)