राज्य व राष्ट्रीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेत
सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी दैदित्यमान कामगिरी करुन, सातारा जिल्ह्याचा
नावलौकिक वाढविल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व शिवराज ससे शूटिंग
अकॅडमी, सातारा यांच्यावतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या
खेळाडूंचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.
मा. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते
राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य कु.आर्या जाधव, कुणाल ससे, अखिलेश जगताप,
आदित्य रसाळ, गारगी फडतरे, विक्रम शिंदे, महेश घाडगे, आकांक्षा दिक्षीत, प्रांजली
धूमाळ यांचा सत्कार करण्यात आला. शूटिंग
या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचा मोठा दबदबा असून, आगामी काळात जिल्ह्यातील
खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन, पदक प्राप्त करावे असे मत मा. श्रीमंत छत्रपती
शिवाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच मा. सुहास पाटील, जिल्हा क्रीडा
अधिकारी,सातारा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर श्री.
प्रदिप ससे यांनी शिवराज ससे शूटिंग अकॅडमीमध्ये खेळाडूंकरिता उपलब्ध असणा-या राष्ट्रीय
दर्जाच्या सुविधांबद्दल सर्वांना माहिती दिली. या कार्यक्रमास श्री. विजय पवार, श्री. प्रशांत
धूमाळ, डॉ. उदय फडतरे प्रमुख पाहूणे म्हणून व खेळाडूंचे पालक उपस्थित होते
No comments:
Post a Comment