Sunday, 6 August 2017

जिल्हास्तर शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धे बाबत महत्वाची सूचना, सन 2017-18

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा /कनिष्ट महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की सन 2017-18,या शैक्षणिक वर्षात आयोजित होणाऱ्या शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धांच्या ठिकानात प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला असून ,सर्व वयोगटाच्या स्पर्धा घडसोली मैदान व मुधोजी महाविद्यालय फलटण या ठिकाणी होतील.तरी सातारा जिल्ह्यातील संबंधीत शाळा/ कनिष्ट महाविद्यालयचे मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक ,संघ व्यवस्थापक ,खेळाडु यांनी नोंद घ्यावी ,अधिक माहिती करीत व सर्व गटाच्या भाग्यपत्रिका पहाण्यासाठी sataradso.blogspot.in हा ब्लॉग पहावा (दि.7/8/17 रोजी) असे आवाहन श्री सुहास पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.स्पर्धा वेळापत्रक पुढील प्रमाणे :- 14 वर्षे मुले दि.9 ते 11 ऑगस्ट ,14 वर्षे मुली दि.11 ऑगस्ट ,17 वर्षे मुले दि.12 ते 14 ऑगस्ट ,17 वर्षे मुली 14 ऑगस्ट,19 वर्षे मुले 15 ते 17 ऑगस्ट,19 वर्षे मुली 18 ऑगस्ट 2017.

No comments:

Post a Comment