जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित होणार्या जिल्हास्तर जलतरण, डाय़व्हींग व वॉटरपोलो क्रीडा स्पर्धांच्या तारखा व स्पर्धा ठिकाणामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आलेला असुन सुधारित तारखा व स्पर्धा ठिकाण खालीलप्रमाणे :-
अक्र | खेळ | वयोगट | सुधारित तारखा | स्पर्धा ठिकाण |
१ | जलतरण | १४,१७ वर्षाखालील मुले, मुली | ६ सप्टेंबर २०१२ | संजीवन विद्यालय पाचगणी ता. महाबळेश्वर जि. सातारा |
२ | जलतरण | १९ वर्षाखालील मुले,मुली व महिला | ०७ सप्टेंबर २०१२ | |
३ | डायव्हींग | १४,१७,वर्षाखालील मुले मुली | ||
४ | वॉटरपोलो | १९ वर्षाखालील मुले |
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ब्लॉगवर (sataradso.blogspot.in)वरील बदल तसेच जलतरण स्पर्धेचे बाबनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा व
वरील बदलांची नोंद घेऊन संबंधित शाळांनी आपले खेळाडू स्पर्धा ठिकाणी वेळेवर उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. उदय जोशी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment