Friday, 31 August 2012

जिल्हास्तरिय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत नव्या वयोगटाचा समावेश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने जिल्हास्तरिय शालेय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते ७ सप्टेंबर २०१२ रोजी भारतमाता विद्यालय, मायणी ता. खटाव जि. सातारा येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुले व मुलींचा वयोगट नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. ज्या शाळांना या स्पर्धेमध्ये सहभागी घ्यावयाचा आहे त्या शाळेंनी आपला प्रवेश अर्ज स्पर्धा ठिकाणी घेऊन यावे असे आवाहन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
        जिल्हास्तरिय शालेय नेटबॉल स्पर्धेचा कार्यक्रम खालीलप्रमाणे-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
नेटबॉल
१४ वर्षाखालील मुले मुली
०६ सप्टेंबर २०१२
भारतमाता विद्यालय मायणी ता. खटाव जि. सातारा
१७ वर्षाखालील मुले मुली
१९ वर्षाखालील मुले व मुली


        अधिक महितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी ०२१६२-२३७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment