राष्ट्रीय युवा
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.
केंद्र शासनाच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी जिल्हा,राज्य,
व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लखनिय
कार्य करणार्या युवक-युवतींना व स्वयंसेवी संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात
येतो. सन २०१२-१३ या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यात
युवक-युवतींच्या विकासासाठी कार्य करणार्या नोंदणीकृत स्वंयसेवी संस्था,
युवक-युवती कडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी संस्था व
युवक-युवतींनी जिल्हा क्रीडा कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,
सातारा येथे प्रस्ताव सादर करावा, तसेच कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर
व कार्यालयाच्या sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा, असे
आवाहन उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment