राज्यातील / जिल्ह्यातील युवांनी केलेले
समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी, त्यांना
प्रोत्साहन मिळावे; यासाठी राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी
देण्यास संदर्भिय शासन निर्णय़ान्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
सन २०१३-१४ या वर्षाच्या
पुरस्काराकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
१. जिल्हास्तर युवा पुरस्कार :- जिल्हास्तरावर एक युवक
व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. सदर
पुरस्काराचे अर्ज विहित नमुण्यात भरुन माहे फेब्रुवारी २०१४ अखेर जिल्हा क्रीडा
अधिकारी, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत.
२. राज्यस्तर युवा पुरस्कार :- राज्यस्तरावर
पुरस्कारकरिता निवड करताना क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार युवक / युवती एक
तसेच नोंदणीकृत संस्था एक यांना पुरस्कार देण्यात येईल. सदर पुरस्काराचे अर्ज
विहित नमुण्यात भरुन माहे एप्रिल २०१४ अखेर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवती
इमारत, पुणे-४११००१ या पत्त्यावर मागविण्यात येत आहेत.
जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कार संबंधी अधिक
माहितीसाठी व लाभार्थींनी करावयाचा नमुना अर्ज प्रपत्र अ व ब क्रीडा व युवक सेवा
संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे किंवा विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, व जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment