Friday, 24 January 2014

जिल्हा क्रीडा पुरस्कार – २०१३

जिल्हा क्रीडा पुरस्कार – २०१३
        जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून डॉ.रामास्वामी एन, जिल्हाधिकारी,सातारा तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, सातारा यांच्या अध्यक्षते खालील नियुक्त श्री.सुजित शेडगे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार्थी, श्री.गफ़ार उर्फ़ अमजद पठाण, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार्थी, उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा, कोल्हापुर विभाग, व उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या निवड समितीने सन २०१३ च्या गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार्थीची निवड केलेली आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रक्कम रुपये १०,०००/- असे आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण मा.ना.श्री.शशिकांत शिंदे, मंत्री, जलसंपदा तथा पालकमंत्री,सातारा यांच्या शुभ हस्ते दि.२६ जानेवारी, २०१४ रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर होणार आहे.
सन २०१३ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे: 
गुणवंत खेळाडू पुरस्कार (महीला प्रवर्ग) : 

१) कु.मोरे वर्षा शामसुंदर,(रोप मंल्लखांब) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
              २४ व २९ व्या कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत, वैयक्तीक व सांघिक  प्रकारात ३ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादन केले. २६ व्या वरीष्ट महिला राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तीक व सांघिक प्रकारात २ सुवर्ण पदक संपादन केले. ३२ व्या वरिष्ठ राज्य स्पर्धेत वैयक्तीक व सांघिक  प्रकारात २ कांस्य पदक संपादन केले. ५७ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
१) श्री.जाडकर संजय बाबासो (खो.खो) :


    सातारा जिल्ह्यातील कु.प्रियांका रामचंद्र येळे,प्राजक्ता रमेश खुचेकर,करीष्मा रतीक नागरजी,रोहीनी अनिल बोबडे,प्रगती नंदकुमार साळवी,अस्मिता तुकाराम पवार,श्रुती बाळाकृष्ण भोसले यासारख्या वरिष्ठ, कनिष्ठ व शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन पदक संपादन केलेल्या खेळाडूंचे मार्गदर्शक. याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यस्तरावर खेळणारे खेळाडू मार्गदर्शन घेत असतात.

No comments:

Post a Comment