महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन,नागपूर कडून बनावट कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याबाबत..
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने विविध संघटनांच्या विविध प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी 5 टक्के आरक्षणांतर्गत करण्यात येते.
तसेच संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्पर्धांत सहभागी तसेच प्राविण्यप्राप्त
खेळाडूंना 10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात येतात. महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन नागपूर यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सन 2008-09 या वर्षामध्ये खुल्या गटातील प्राविण्यप्राप्त व सहभागी खेळाडूंची यादी ग्रेस गुणाकरीता सादर केली. तसेच सदर संघटनेने 5 टक्के आरक्षणांतर्गत सन 2008-09 मधील स्पर्धेच्या खुल्या गटाची यादी संचालनायलाकडे सादर केली. 5 टक्के आरक्षांतर्गत प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करीत असताना एकाच स्पर्धेच्या दोन वेगवेगळया यादया महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेने संचालनालयास सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नागपूर यांनी बनावट यादी संचालनालयास सादर करुन शासनाची फसवणुक केली असल्याने राज्य शासनाने महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नागपूर यांचेवर खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
·
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेमार्फत
महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नागपूर यांना
देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात येत आहे.
·
महाराष्ट्र क्रीडा परिषदेमार्फत देण्यात
येणारे सर्व प्रकारचे अनुदान या संघटनेला बंद करण्यात येत आहे.
·
शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी
असणारे 5 टक्के आरक्षण थ्रोबॉल या क्रीडा प्रकारासाठी रद्द
करण्यात येत आहेत.
·
इयत्ता 10 व
12 वी मधील थ्रोबॉल या खेळासाठी 25 ग्रेस गुणांची सवलत रद्द करण्यात येत आहे.
·
या संघटनेकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या
सर्व कागदपत्रांची व संघटनेच्या संपूर्ण कारभाराची क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत
चौकशी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment