जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, सातारा व विविध संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन व युवा
सप्ताह साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे उद्घाटन मा.
श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या
प्रसंगी श्री. अनुप शिंदे, उद्योगपती, श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्रीमती
मनिषा पाटील, क्रीडा अधिकारी व श्री. अभय चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक आदी उपस्थित
होते.
युवा महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन, मिरवणूक काढण्यात आली. ही रॅली
राजवाडा चौक येथुन सुरु होऊन पोवई नाका मार्गे लेझीम, ढोल यांच्या तालात श्रीमंत
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सांगता झाली.
युवा महोत्सवांतर्गत युवक-युवतींसाठी
कार्यशाळा, निबंध, वत्कृत्व, पाककला, रांगोळी, लोकगीत, लोकनृत्य, चित्रकला,
भिंतीपत्रके, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
स्वातंत्र्य लढ्यातील युवकांचे कार्य, राष्ट्रीय प्रगतीवर युवकांचे कार्य,
राष्ट्रीय एकात्मता आदी चर्चासत्र घडवून आणली. राष्ट्रपर समूह गायन स्पर्धा,
आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर यावर डॉ. पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
युवा महोत्सवाचा समारोप समारंभ
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. या समारंभामध्ये
विविध स्पर्धेमधिल विजेत्यांना मेडल, रोख पारितोषिके देण्यात आली.
No comments:
Post a Comment