Tuesday, 1 July 2014

सन २०१४-१५ मधील तालुकानिहाय स्पर्धा आयोजन बैठकीचा कार्यक्रम जाहीर

             महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रीडा परिषद, सातारामार्फत सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन करणे या कार्यक्रमांतर्गत तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
            सन २०१४-१५ या वर्षातील तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तालुका निहाय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तालुका निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आलेले असून, आपल्या विद्यालय/महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक/क्रीडा विभाग प्रमुखास आपल्या तालुक्यातील बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात यावे.
            बैठकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
अक्र
बैठकीचे ठिकाण व संपर्क दिनांक
समाविष्ट तालुके
बैठक दिनांक
बैठक वेळ
१.
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा. (श्री.तानाजी मोरे : ९७६४२७४१३८)
सातारा व जावली
१० जुलै, २०१४
सकाळी ११:०० वा.
२.
सरस्वती विद्यालय, कोरेगांव.
श्री. अहिरे एस.टी. : ९७६३३५९२४२
कोरेगांव
१० जुलै, २०१४
दुपारी ०२:०० वा.
३.
दहिवडी महाविद्यालय, दहिवडी.
श्री. भोईटे : ९४२१९१०६०७
माण
११ जुलै, २०१४
सकाळी ११:०० वा.
४.
हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज.
श्री. घार्गे : ९८८१४३९१९०
खटाव
११ जुलै, २०१४
दुपारी ०२:०० वा.
५.
ज्ञानदिप इंग्लिश मिडी. स्कूल, पसरणी.
श्री. लेंभे : ९८८१५५५६११
वाई व महाबळेश्वर
१२ जुलै, २०१४
सकाळी ०९:०० वा.
६.
राजेंद्र विद्यालय, खंडाळा.
श्री. गाढवे डी.जी. ९९२१०६२५६४
खंडाळा
१४ जुलै, २०१४
सकाळी ११:०० वा.
७.
मुधोजी हायस्कूल, फलटण.
श्री. धुमाळ : ९८९०३८२२०४
फलटण
१४ जुलै, २०१४
दुपारी ०२:०० वा.
८.
माने-देशमुख विद्यालय, पाटण.
श्री. कुंभार : ९८८११७९०८६
पाटण
१५ जुलै, २०१४
सकाळी ११:०० वा.
९.
विठामाता हायस्कूल, कराड.
श्री. भोसले : ९८२२२९३६२४
कराड
१५ जुलै, २०१४
दुपारी ०२:०० वा.

            सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास नेहमीप्रमाणे सहकार्य करावे व मागणीनुसार क्रीडा शिक्षकांच्या सेवा क्रीडा विषयक बाबींसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment