राष्ट्रीय युवा पुरस्कार २०१३-१४
केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, युवा कल्याण विभाग यांच्यामार्फत सन २०१३-१४ या वर्षाकरिता राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या १३ ते ३५ वयोगटातील युवक, युवती व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. युवकांच्या विकासासाठी कार्य करणार्या युवक-युवती तसेच स्वयंसेवी संस्था यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष संपर्क साधून अथवा www.yas.nic.in या संकेतस्थळास भेट देऊन विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावा व परिपूर्ण प्रस्ताव दि. १० ऑगस्ट, २०१४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा.
राष्ट्रीय युवा पुरस्कार २०१३-१४ करिता अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..
No comments:
Post a Comment