महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
देण्याची योजना कार्यान्वित असून, यामध्ये राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, ( साहसी व
अपंग खेळाडूंसह ) संघटक/कार्यकर्ते यांच्यासाठी “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार,”
क्रीडा मार्गदर्शकांसाठी “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,” महिला
कार्यकर्तीस “जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार” तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता “शिवछत्रपती
राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येतात.
सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षासाठी मान्यता
प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय
स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, (साहसी व अपंग
खेळाडूंसह ) कार्यकर्ते / संघटक, तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुण्यातील
अर्ज संबंधित राज्य संघटनेचा ठराव व शिफारशीसह दि. १५ सप्टेंबर, २०१४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा
येथे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा
अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment