Thursday, 29 August 2013

राष्ट्रीय क्रीडा दिन : २९ ऑगस्ट २०१३


           हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा द्वारा श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे १००० खेळाडू, विद्यार्थी व युवकांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून क्रीडा दिनाच्या विविध कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सातारा जिल्हा क्रीडा व शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, श्री. विलास जाधव होते. याप्रसंगी सातारा जिल्हा अम्यचुअर बॉक्सिंग संघटनेचे सचिव, श्री. योगेश मुंदडा, सातारा जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव, श्री. जितेंद्र गुजर, क्रीडा मार्गदर्शक, श्री बळवंत बाबर, श्री. तानाजी मोरे, श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा अधिकारी, श्री. उत्तम पवार, श्री. आर.व्ही. माने इ. उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या दुपार सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच श्री. विलास जाधव व श्री. उदय जोशी यांनी खेळाडूं, विद्यार्थी व युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. क्रीडा दिनानिमित्त बॅडमिंटन, क्रीकेट, खो-खो इ. खेळांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले होते.



हॉकीजे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, शेजारी श्री. सुनिल धारुरकर, श्री. तानाजी मोरे, श्री. बळवंत बाबर, श्री विलास जाधव, श्री. उत्तम पवार, श्री. जितेंद्र गुजर, श्री. नाळे श्री. आर.व्ही. माने व इतर मान्यवर

जिल्हास्तर शालेय क्रीकेट स्पर्धेत संजीवन विद्यालयास अजिंक्यपद

        जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने दि. २० ते २९ ऑगस्ट २०१३ या कालावधित जिल्हास्तर शालेय क्रीकेट (१४ वर्षाखालील मुले) क्रीकेट स्पर्धा श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
       या क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामना संजीवन विद्यालय, पाचगणी व श्री. शिवाजी विद्यालय,कराड यांच्यात संपन्न झाला. या सामन्यामध्ये संजीवन विद्यालयाने ०७ गडी राखुन विजय प्राप्त करून दि. ०४ ते ०५ सप्टेंबर २०१३ रोजी सातारा येथे होणार्‍या कोल्हापूर विभागीय शालेय क्रीकेट स्पर्धेत सहभाग निश्चित झालेला आहे.     संजीवन विद्यालयाकडून हेरंब पावस्कर याने सर्वाधिक १७ धावा केल्या.
    स्पधेतील विजयी व उप-विजयी संघांना श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री.तानाजी मोरे, श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा अधिकारी, श्री. बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक व श्री. दिपक पाटील, ज्योती स्पोर्ट्स वर्ल्ड उपस्थित होते.
विजयी संघ : संजीवन विद्या. पाचगणी ता. महाबळेश्वर


उपविजेता संघ : श्री. शिवाजी विद्या. कराड ता. कराड

Friday, 23 August 2013

जिल्हास्तर जवाहरलाल नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धा २०१३-१४



जिल्हास्तर जवाहरलाल नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
जवाहरलाल नेहरू हॉकी
१७ वर्षाखालील मुले व मुली
२९ ऑगस्ट २०१३
मुधोजी कॉलेज, फलटण ता. फलटण जि. सातारा
२.
१५ वर्षाखालील मुले
३० ऑगस्ट २०१३

Thursday, 22 August 2013

कोल्हापूर विभागीय शालेय क्रीकेट (१४ वर्षाखालील मुले) क्रीडा स्पर्धा २०१३-१४



॥ कोल्हापुर विभागीय क्रीकेट (१४ वर्षाखालील मुले) क्रीडा स्पर्धा २०१३-१४ कार्यक्रम ॥

१.
उपस्थिती दिनांक
:
०३ सप्टेंबर २०१३ सांय ०५:०० वाजेपर्यंत.
२.
स्पर्धा दिनांक
:
०४ ते ०५ सप्टेंबर २०१३.
३.
स्पर्धा ठिकाण
:
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा.
४.
निवड चाचणी उपस्थिती दिनांक
:
०५ सप्टेंबर २०१३ दु. १२:०० वा.
५.
निवड चाचणी दिनांक
:
०५ सप्टेंबर २०१३.
६.
संपर्क
:
श्री. बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक - ९८५०९६२३४५

Wednesday, 21 August 2013

जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४



जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
बास्केटबॉल
१४ वर्षाखालील मुले  व मुली
१६ सप्टेंबर २०१३
मुधोजी क्लब, फलटण ता. फलटण जि. सातारा.
२.
१७ वर्षाखालील मुले  व मुली
१७ सप्टेंबर २०१३
३.
१९ वर्षाखालील मुले  व मुली
१९ सप्टेंबर २०१३