Thursday, 29 August 2013

राष्ट्रीय क्रीडा दिन : २९ ऑगस्ट २०१३


           हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा द्वारा श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे १००० खेळाडू, विद्यार्थी व युवकांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून क्रीडा दिनाच्या विविध कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सातारा जिल्हा क्रीडा व शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, श्री. विलास जाधव होते. याप्रसंगी सातारा जिल्हा अम्यचुअर बॉक्सिंग संघटनेचे सचिव, श्री. योगेश मुंदडा, सातारा जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव, श्री. जितेंद्र गुजर, क्रीडा मार्गदर्शक, श्री बळवंत बाबर, श्री. तानाजी मोरे, श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा अधिकारी, श्री. उत्तम पवार, श्री. आर.व्ही. माने इ. उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या दुपार सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच श्री. विलास जाधव व श्री. उदय जोशी यांनी खेळाडूं, विद्यार्थी व युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. क्रीडा दिनानिमित्त बॅडमिंटन, क्रीकेट, खो-खो इ. खेळांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले होते.



हॉकीजे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, शेजारी श्री. सुनिल धारुरकर, श्री. तानाजी मोरे, श्री. बळवंत बाबर, श्री विलास जाधव, श्री. उत्तम पवार, श्री. जितेंद्र गुजर, श्री. नाळे श्री. आर.व्ही. माने व इतर मान्यवर

No comments:

Post a Comment