Thursday, 26 June 2014

तालुकास्तर व जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचणी सन २०१४-१५ कार्यक्रम जाहीर

              शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीत सन २०१४-१५ या वर्षाकरिता नविन प्रवेश देण्यासाठी ८ ते १४ वर्ष वयोगटातील शालेय शिक्षण घेत असलेल्या व नसलेल्या मुला-मुलींच्या १. वजन, २. उंची, ३. ३० मी भरधाव धावणे, ४. ८०० मी धावणे, ५. ६ x १० मी शटल रन, ६. उभे राहून लांब उडी, ७. उभे राहून उंच उडी, ८. मेडीसीन बॉल थ्रो, ९. लवचिकता या चाचण्या घ्यावयाच्या आहेत.
            वरील नमूद प्रत्येक चाचणीस अधिकतम ३ गुण असून, या नऊ चाचण्या दिल्यानंतर मुला-मुलींच्या गुणवत्तेनुसार जे मुले-मुली १७ किंवा अधिक गुण संपादन करतील अशा मुला-मुलींना तालुकास्तर नैपुण्य चाचणीसाठी प्रवेश दिला जाईल.

            आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या शालेतील क्रीडा शिक्षकांच्या मदतीने क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे शाळास्तरावर आयोजन दि. ०७ जुलै २०१४ च्या आत करुन, पात्र मुला-मुलींना तालुकास्तर चाचण्यांसाठी पाठवावे. तालुकास्तर व जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचणीचा कार्यक्रम पूढील प्रमाणे असून सकाळी ठीक ०९:०० वा. चाचण्या सुरु करण्यात येतील याची दक्षता घेण्यात यावी.

.क्र
तालुक्याचे नाव
स्थळ
दिनांक
जावली
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
१५ जुलै २०१४
खंडाळा
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा
१६ जुलै २०१४
सातारा
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
१७ जुलै २०१४
पाटण
बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण ता. पाटण
१८ जुलै २०१४
कोरेगाव
डि.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव ता. कोरेगाव
१८ जुलै २०१४
माण
सिंध्दनाथ मेघा सिटी, म्हसवड, ता.माण
१९ जुलै २०१४
खटाव
श्री.लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कुल, खटाव ता. खटाव
२० जुलै २०१४
महाबळेश्वर
अंजुमन इस्लाम पब्लीक स्कुल, पाचगणी ता.महाबळेश्वर
२० जुलै २०१४
फ़लटण
तालुका क्रीडा संकुल,जाधववाडी, ता.फ़लटण
२१ जुलै २०१४
१०
वाई
किसनवीर महाविद्यालय, वाई ता. वाई
२२ जुलै २०१४
११
कराड
वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड ता. कराड
२२ जुलै २०१४
सातारा जिल्हास्तर
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
२५ ते २६ जुलै २०१४

तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. (०२१६२)२३७४३८ व ब्लॉग  sataradso.blogspot.in यावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment