Friday, 12 December 2014

क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उदघाटन सन २०१४-१५

क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उदघाटन सन २०१४-१५

             जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा द्वारा क्रीडा सप्ताहा निमीत्य दि.१२ ते १८ डिसेंबर २०१४ या कालावधीत श्रीमंत छ.शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजीत होत असलेल्या क्रीडा सप्ताहा निमीत्य दिनांक १२ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:३० वा.सातारा शहरातील प्रमुख रसत्यावरुन २५० खेळाडुनी संचलन केले.यानंतर सप्ताहाचे उदघाटन श्री.आर वाय जाधव (अध्यक्ष,सातारा जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना ) यांच्या शुभ हस्ते श्रीमंत छ.शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे झाले,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री योगेश मुंदडा( सचिव,सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन) हे होते.या प्रसंगी श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा,श्री कालीदास गुजर,श्री रवी यादव, श्री फ़रांदे विश्वनाथ,श्री विजय खंडाईत,श्री राहुल मोरे तसेच विवीध खेळ संघटनांचे प्रतिनीधी ई.उपस्थीत होते.उदघाटना नंतर गुरुकुल स्कुल व के एस डी शानभाग विद्यालयाच्याच्या विद्यार्थांनी राष्ट्र भक्तीपर गायन सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धारुरकर सुनिल (क्रीडा अधिकारी) यानी तर आभार श्री. तानाजी मोरे(क्रीडा अधिकारी) यानी मानले.

         दि.१३ रोजी सातारा जिल्ह्यातील विवीध शाळातील विद्यार्थी भारतीय पारंपारीक व्यायाम प्रकार व खेळाचे प्रदर्शन आणि लोकनृत्याचे सादरीकरण करणार आहेत. क्रीडा सप्ताहा निमीत्य आयोजीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment