Tuesday, 16 December 2014

खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार करणेबाबत.


           आपणांस विदीतच आहे की, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी १५ जानेवारी या ऑलम्पिकवीर कै.पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना, राष्ट्रीय स्पर्धेस महाराष्ट्र राज्याच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केलेल्या क्रीडा मार्गदर्शकांना व राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा ट्रॅकसूट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो.
           दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी सन २०१३-१४ (०१ जुलै, २०१३ ते ३० जुन,२०१४) या  वर्षात शालेय, ग्रामीण, महिला व एकविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या, तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू, राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडू / कार्यकर्ते व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता नियुक्त मार्गदर्शक यांनी प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह आपले अर्ज दि.०५ जानेवारी, २०१५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे सादर करावेत .

          तसेच एकविध संघटनांच्या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी सातारा जिल्हा संघटनेच्या शिफ़ारशीसह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२१६२-२३७४३८ या क्रमांकावर किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री.उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment