क्रीडा व युवक
सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
सातारा व सातारा सेपक-टकरा असो.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय सेपक-टकरा
(१९ वर्षाखालील मुले व मुली ) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. ०७ ते ०८ डिसेंबर, २०१४
या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले
आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या ०८ विभागामधून किमान १५० खेळाडू,
क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.
सदर स्पर्धेमधून राष्ट्रीय शालेय सेपक-टकरा
स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा मुला व मुलींचा संघ निवडला जाणार आहे. या
राज्यस्तर शालेय सेपक-टकरा स्पर्धेचे उद्घाटन दि. ०७ डिसेंबर, २०१४ रोजी दुपारी
होणार आहे.
No comments:
Post a Comment