Tuesday, 20 January 2015

भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, ज्युडो, कबड्डी व कुस्ती क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी

निवासी व अनिवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्रासाठी भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, ज्युडो, कबड्डी व कुस्ती क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी

सातारा : भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, ज्युडो, कबड्डी व कुस्ती क्रीडा प्रकारांमधील १२ ते १८ वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे, वरील सहा क्रीडा प्रकारात निवासी व अनिवासी प्रशिक्षण केंद्रातील निवडीसाठी पात्रतेचे निकष  अ) खेळाडूंच्या क्षमता व कामगिरीच्या आधारे निवड करण्यात येईल, ब) मागील दोन वर्ष राज्य किंवा राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना त्यांच्या शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या सक्षमतेच्या आधारावर व सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने निवडण्यात येईल, क) जे खेळाडू जिल्हास्तरावर पदक संपादन करुन राज्यस्तर स्पर्धेत सहभागी झालेले असतील, अशा खेळाडूंची त्यांच्या वैद्यकीय व शारीरिक सुदृढतेच्या आधारावर आणि क्रीडा नैपुण्य चाचण्यांद्वारे निवड केल्या जाईल. निवासी केंद्रामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना ३३० दिवसांसाठी मोफत निवास, भोजन (प्रतिदिन रु.१७५/- दरानुसार), क्रीडा गणवेश (कमाल रु.५,०००/-) या सुविधांसह तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल, या प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या खेळाडूंना प्रतिवर्ष केवळ रु.७,०००/- त्यांच्या क्रीडा स्पर्धांमधील सहभाग, शैक्षणिक, वैद्यकीय, विमा आणि इतर खर्चासाठी भरावे लागणार आहेत, तर अनिवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या खेळाडूंना रु.६,०००/- वार्षिक शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धांमधील सहभागासाठी वार्षिक रु.३,०००/-, क्रीडा गणवेश वार्षिक रु.४,०००/- व विमा वार्षिक रु.१५०/- सुविधा उपलब्ध होतील.
याशिवाय जे खेळाडू क्रीडा नैपुण्य चाचण्यांच्या पात्र वयापेक्षा वयाधिक्य आहेत, म्हणजे १२-१८ व १२-२५ पेक्षा अधिक आहेत व अशा खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ( वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, आंतरराज्य वरिष्ठ गट स्पर्धा, आंतरविद्यापीठ (वरिष्ठ गट) स्पर्धा, सर्किट मीट, परमीट मीट आणि फेडरेशन कप) प्रथम सहा क्रमांकाची कामगिरी करणा-या खेळाडूंना तसेच सांघिक क्रीडा प्रकारासाठी उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या संघातील खेळाडूंना निवासी व अनिवासी निपुणता साधना केंद्रामध्ये (Centre of Excellence) निकषांच्या आधारे प्रवेश दिल्या जाईल. निवासी केंद्रामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना ३३० दिवसांसाठी मोफत निवास, भोजन (प्रतिदिन रु.२२५/- दरानुसार), क्रीडा गणवेश (कमाल रु.६,०००/-) या सुविधांसह तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल,  तर अनिवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या खेळाडूंना रु.९,०००/- वार्षिक शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धांमधील सहभागासाठी वार्षिक रु.३,०००/-, क्रीडा गणवेश वार्षिक रु.६,०००/- व विमा वार्षिक रु.१५०/- प्रमाणे सुविधा उपलब्ध होतील.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या खेळाडूंनी त्यांच्या वय (प्राविण्यानुसार कमी/अधिक करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना राहतील), वैयक्तिक माहिती, विहीत कागदपत्रे, फोटो व जन्मतारखेचा मूळ दाखला यासह दि.०४ ते ०५ फेब्रुवारी, २०१४ या कालावधीत भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), टाईम्स ऑफ इंडिया ऑफिस जवळ, मुंबई-४००१०१ या ठिकाणी उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी श्रीमती राजेश्वरी म्हेत्रे, टेबल-टेनिस क्रीडा मार्गदर्शक दूरध्वनी क्रमांक ०२२-२८८५८३९५ व ०९८६९०४९४५० यांना संपर्क साधावा, असे भारतीय खेळ प्राधिकरणाचे उपसंचालक श्री.सतिश सरहद यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment