Friday, 9 January 2015

राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा,सातारा २०१४-१५.

संदर्भ :           संचालनालयाचे पत्र क्र. क्र.क्रीयुसे/राशाक्रीस्प/१४/१४-१५/
 का.४, दि.०३ जून, २०१४ व २९ डिसेंबर, २०१४.

उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्रान्वये, २०१४-१५ वर्षातील राज्यस्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सातारा वर सोपविण्यात आलेली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सातारा मार्फत राज्यस्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धां, सातारा २०१४-१५ चे  आयोजन खालील कार्यक्रमानुसार करण्यात येणार आहे. 
॥ राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा कार्यक्रम ॥
१. स्पर्धा स्थळ, उपस्थिती, निवास व भोजन व्यवस्था.
:
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, एस.टी.स्टॅण्ड जवळ, रविवार पेठ, सातारा. (दूरध्वनी ०२१६२-२३७४३८)
२. स्पर्धा कालावधी
:
दि. ०३ ते ०६ फेब्रुवारी, २०१५.
३. उपस्थिती
:
दि. ०३ फेब्रुवारी, २०१५ रोजी सांय ०५.०० वा.पर्यंत
(टीप : खेळाडूं सोबत चेस क्लॉक (Chess Clock) असणे बंधनकारक आहे.)
राज्यस्तर शालेय बुद्धीबळस्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची विभाग निहाय संख्या.
अ.
क्र.
वयोगट
खेळाडू संख्या वयोगट निहाय
क्रीडा मार्गदर्शक/ व्यवस्थापक
मुले
मुली
१.
१४,१७ व १९ वर्षाखालील-बुद्धीबळ
विभाग व वयोगट निहाय ५ (पाच)
विभाग व वयोगट निहाय
५ (पाच)
विभाग निहाय
२ (दोन)
स्पर्धा आयोजनाबाबत खेळाडू, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी महत्वाच्या सूचना/नियमावली
१.         राज्यस्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, भारतीय शालेय खेळ महासंघ आणि अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ यांची मार्गदर्शक तत्वे व नियमांनुसार आयोजित करण्यात येतील.
२.    स्पर्धेसाठी आवश्यक क्रीडा साहित्य खेळाडूंनी स्वतः सोबत आणावे.चेस क्लॉक (Chess Clock) बंधनकारक.
३.        स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंच्या संख्या वरील तक्त्यात नमुद केली आहे. त्या संख्येनुसार अधिकृत
            प्रवेशिकेत नमूद खेळाडू व संघ व्यवस्थापकांना निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध केली जाईल.
४.        निवासासाठी प्रत्येक खेळाडूजवळ पुरेसे अंथरुण, पांघरुण तसेच दैनंदिन वापराच्या (उदा. कुलुप, किल्ली इ.) असणे आवश्यक आहे. खेळाडूंसोबतच्या इतर व्यक्तींची निवास/भोजन व्यवस्था करण्यात येणार नाही, याची स्पष्ट कल्पना खेळाडूंना देण्यात यावी.
५.    खेळाडूंसोबत कोणत्याही मौल्यवान वस्तु/साहित्य असू नये, अशा वस्तुंची कोणत्याही प्रकारची जबाबदारी आयोजक अथवा आयोजन समिती स्वीकारणार नाही.
६.        उदघाटन व समारोप प्रसंगी प्रत्येक विभागाचा ध्वज व नामफलक संघासोबत असणे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक खेळाडूने उद्‌घाटन प्रसंगी संचलनात सहभागी असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत खेळणा-या खेळाडूंनाच प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
७.         स्पर्धा आयोजनाबाबतचे सर्वाधिकार राज्यस्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा आयोजन समितीने राखून ठेवले आहेत. उपस्थितीनंतर संघ व्यवस्थापकांच्या बैठकीला सर्व संघव्यवस्थापकानी हजर राहणे अनिवार्य आहे.
८.      मुलींच्या संघासोबत महिला व्यवस्थापिका असणे आवश्यक आहे. संघ व्यवस्थापकाकडून निवासस्थानी अनामत रक्कम (परतावा) स्वीकारली जाईल. निवासाच्या ठिकाणी नुकसान व मोडतोड आढळून आल्यास अनामत रक्कमेतून योग्य ती नुकसान भरपाई वसूल  करण्यात येईल.
९.         स्पर्धास्थळी स्पर्धेदरम्यान जीवित वा वित्तहानी झाल्यास आयोजक व आयोजन समिती जबाबदार राहणार नाही, त्यादृष्टीने सर्व खेळाडू, व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक यांनी काळजी घ्यावी.
१०.       वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असणा-या खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होऊ नये.
1.       आयोजन समितीमार्फत गठीत तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.
१२.       खेळाडूंच्या सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे, त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर खेळाडूसोबत जन्म दाखला व मागील वर्षाची गुणपत्रिका (Birth CertificateMark Sheet of Previous year Examination) याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. Eligibility Certificate वर जिल्हा क्रीडा अधिका-यांची प्रतिस्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

    संपर्क : श्री.टी.ए.मोरे,क्री.अ.-९७६४२७४१३८, श्री.धारुरकर,क्री.अ.-८२७५२०६८७९, श्रीमती मनिषा पाटील,क्री.अ.-७५८८४६१६८८. श्री.जमीर आत्तार,क्री.मा.-९८२३९२०२१८,

No comments:

Post a Comment