Thursday, 8 January 2015

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा प्राविण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंची शिष्यवृत्ती ऑन लाईन ट्रान्सफर होणार.


भारतीय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात येणा-या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या व प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते.
            सन २०१३-१४ वर्षापासून भारतीय खेळ महासंघ द्वारे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार असून, शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळाडूंची यादी sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            सर्व पात्र खेळाडूंनी आपला खाते क्रमांक, बॅंकेचे नांव, बॅंक शाखा, बॅंक IFSC Code, मोबाइल क्रमांक व आधारकार्ड नंबर (उपलब्ध असल्यास) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना थेट ई-मेल द्वारे (dsoff.satara@dsys.maharashtra.gov.in , dso_satar@yahoo.co.insataradso@gmail.com) किंवा शाळेमार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment