Friday, 4 October 2013

जिल्हास्तर शालेय, महिला व पायका मैदानी क्रीडा स्पर्धा २०१३-१४

जिल्हास्तर शालेय,महिला व पायका मैदानी क्रीडा स्पर्धा २०१३-१४.
            क्रीडा व  युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर महिला 06 ऑक्टोंबर व जिल्हास्तर पायका मैदानी ०७ ऑक्टोंबर २०१३ रोजी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते परंतु काही तांत्रीक कारणामुळे या क्रीडा स्पर्धांच्या तारखा व ठिकाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

            या स्पर्धा नविन तारखेनुसार जिल्हास्तर पायका मैदानी व महिला क्रीडा स्पर्धा दि. १५ ऑक्टोंबर २०१३ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा तसेच जिल्हास्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दि. १० ते १२ ऑक्टोंबर २०१३ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तरी सहभागी खेळाडू, शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा

No comments:

Post a Comment