Saturday, 12 October 2013

कोल्हापूर विभागीय शालेय व पायका कुस्ती क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४.

           जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर शालेय व पायका कुस्ती क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंची निवड विभागस्तर क्रीडा स्पर्धेकरिता झालेली आहे.

            विभागस्तर पायका कुस्ती क्रीडा स्पर्धा दि. १५ ऑक्टोंबर २०१३ व विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा दि. १७ ते १९ ऑक्टोंबर २०१३ या कालावधीत वसंतदादा साखर कारखाना कुस्ती अकॅडमी, सांगली जि. सांगली येथे होणार आहेत. तरी सर्व विजयी खेळाडू / शाळा / महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या दूरध्वनी क्रमांकावर व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधवा.  

No comments:

Post a Comment