भारतीय
शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश
करण्यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार
(अ) राष्ट्रीय
शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यास खालील १२ खेळांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१.
टेनिस बॉल क्रिकेट, २. टेनिक्वाईट, ३. सेपक टकरॉं, ४.
रस्सीखेच, ५. जम्परोप, ६. टेनिस व्हॉलीबॉल,
७.
थांग ता मार्शल आर्ट, ८. वुशू, ९. कयाकिंग व कनोइंग, १०.
सॉफ्ट टेनिस, ११. स्क्वॅश, १२. कराटे.
(ब) राज्यस्तरापर्यंत
घ्यावयाच्या खालील दोन क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१.
वुडबॉल, २. शुटिंगबॉल.
वरील
एकूण १४ खेळांच्या जिल्हा स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा
करण्यासाठी सर्व नव्याने समाविष्ट झालेल्या खेळ प्रकारांच्या जिल्हा संघटंनांची
बैठक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे सोमवार, दि.२८ ऑक्टोबर,
२०१३ रोजी दुपारी ०३.०० वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
या
बैठकीसाठी वरील खेळांच्या संघटनेमार्फत प्राधिकृत पदाधिकारी व संघटनेचा शिक्का
सोबत घेऊन यावा.
तसेच
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे खेळाडू, शाळा, महाविद्यालये यांनी संघ तयारी
करावी, या खेळांच्या जिल्हा स्पर्धांचे आयोजन दिवाळीनंतर करण्यात येणार असून, या
स्पर्धांच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि.२८ ऑक्टोबर, २०१३ ते
०१ नोव्हेंबर, २०१३ या कालावधीत स्वीकारण्यात येतील.
No comments:
Post a Comment