वृत्तपत्र टिप्पणी
भारतीय शालेय
खेळ महासंघाने नव्याने मान्यता दिलेल्या १४ खेळापैंकी टेनिस बॉल क्रिकेट (१९
वर्षाखालील मुले व मुली) खेळाच्या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा
व टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ नोव्हेंबर, २०१३ पासून श्रीमंत छत्रपती
शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या क्रीडा
स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धाच समजल्या जाणार असल्याने उपरोक्त खेळांमधील सहभागी खेळाडू
विद्यार्थ्यांमधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना
क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठीच देण्यात येतील.
या खेळांच्या
स्पर्धांचे जिल्हा, विभाग व राज्य या क्रमाने आयोजन करावयाचे असुन, टेनिस बॉल
क्रिकेटच्या राज्य स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या स्पर्धेत
सहभागी होणा-या शाळा/महाविद्यालयांनी आपले प्रवेश अर्ज दि.२१ नोव्हेंबर, २०१३
पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. या खेळाच्या अधिक
माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग sataradso.blogspot.in पहावा किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो.साताराचे अध्यक्ष
श्री.वीरभद्र कावडे यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment