Tuesday, 26 November 2013

जिल्हास्तर शालेय टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद, सातारा व सातारा जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजन करण्यात आलेले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातून मुलांचे २० तर मुलींच्या 04 विद्यालय / महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविलेला होता.
            सदर क्रीडा स्पर्धा या बाद पध्दतीने पार पाडण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेच्या मुलांचा अंतिम सामना धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा व राजेंद्र विद्यालय खंडाळा यांच्यामध्ये पार पडला. यामध्ये धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा विजयी झाले तर मुलींच्या सामन्यामध्ये वेणुताई गर्ल्स हाय. फलटने प.म.शिंदे कन्या विद्यालय, दहिवडीवर विजय प्राप्त केला.

            स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघांना मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी व श्री. विरभद्र कावडे, सचिव, सातारा जिल्हा टेनिस बॉल असो. सातारा, यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. याप्रसंगी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्री. जांभळे, श्री. मनोज मोरे, श्री, महेश बडवे, श्री. शशिकांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती     

No comments:

Post a Comment