भारतीय शालेय
खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खालील नमूद खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश
करण्यासंदर्भात वरील संदर्भिय पत्रान्वये मान्यता दिलेली आहे.
राष्ट्रीय
शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यास खालील 3 खेळांना मान्यता देण्यात
आलेली आहे.
१. रोप
स्किपींग, २. सिलम्बम व ३. फूटबॉल टेनिस.
राज्यस्तरापर्यंत
घ्यावयाच्या खालील सहा क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. बेल्ट
रेसलिंग, २. फिल्ड
आर्चरी, ३. कुडो, ४. पिकल बॉल, ५. सेलिंग, ६. पॉवरलिफ्टींग.
या क्रीडा
स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धाच समजल्या जाणार असल्याने उपरोक्त खेळांमधील सहभागी खेळाडू
विद्यार्थ्यांमधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना
क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठीच देण्यात येतील, इतर लाभ जसे
५ टक्के आरक्षण इ.मिळणार नाहीत.
उपरोक्त खेळांच्या स्पर्धांचे जिल्हा, विभाग व राज्य या क्रमाने आयोजन
करावयाचे असुन, या स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, तसेच अधिक
माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग sataradso.blogspot.in पहावा.
No comments:
Post a Comment