Saturday, 28 December 2013

राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहिर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सातारा, सातारा जिल्हा बेसबॉल असोसिएशन व अनुप शिंदे अण्ड असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय बेसबॉल (१४ वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. २६ ते २८ डिसेंबर २०१३ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले होते. .
            सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या आठ विभागातून मुलांचे ८ व मुलींचे ८ असे एकूण १६ संघ व निवड चाचणीकरिता ८० खेळाडू तसेच ४० संघव्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक सहभागी झालेले होते. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांच्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पुणे विभाग, द्वितीय क्रमांक कोल्हापूर विभाग, तृतीय क्रमांक नाशिक विभाग तसेच मुलींच्यामध्ये प्रथम क्रमांक लातूर विभाग, द्वितीय क्रमांक अमरावती विभाग, तृतीय क्रमांक नाशिक विभागाने पटकविला आहे. सदरच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, मा. श्री. माधव सुर्वे, अध्यक्ष, हेरंब प्रतिष्ठान, सातारा यांच्या शुभहस्ते पदक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आला.
दि. ८ ते ११ जानेवारी २०१४ या कालावधीत रांची (झारखंड) येथे होणा-या ५९वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा प्रातिनिधीक संघ मा. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अशोक सरोदे, ठाणे, श्री. ज्ञानेश काळे, सातारा व सौ. पल्‍लवी शिंदे, सातारा या निवड समिती सदस्यांमार्फत निवडला असून मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संघाची घोषणा केली आहे.
महाराष्टाचा संघ मुले : गणेश खोमणे, जोयेल ठाकूर, स्वप्निल लोदी, विजय चौधरी – पुणे विभाग, ओंकार पवार, अमेय पोळ, तुषार जाधव, अजय पाटील – कोल्हापूर विभाग, स्वप्निल चव्हाण, शाहू देशमुख – नाशिक विभाग, सनद दुबे, अनंत नितनवार – अमरावती विभाग, हर्षल म्हात्रे, चिराग सोनावणे – मुंबई विभाग, शुभम नवले – औरंगाबाद विभाग, ऋषीकेश घोंगडे – लातूर विभाग,
मुली : सना पठाण, ज्योती पवार, स्नेहा देवकर – लातूर विभाग, कादंबरी खापरे, ऋतिका चाटी, पुजा देऊळकर – अमरावती विभाग, जागृती तोमर, योगेश्वरी तोमर – नाशिक विभाग, समृध्दी देसाई, अनुष्का परब – मुंबई विभाग, वैष्णवी थोरात, नमिरा मुजावर – कोल्हापूर विभाग, शिवानी बिराजदार, प्रतिक्षा पवार – पुणे विभाग, भूमी कायते – औरंगाबाद विभाग, विशाखा दास – नागपूर विभाग
            या दोन्ही संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर दि. ०१ जानेवारी २०१४ पासून मुंबई या ठिकाणी होणार असून, तेथून राष्ट्रीय स्पर्धेकरिता संघ रांची (झारखंड) रवाना होणार आहे.

            या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्री. अनुप शिंदे, अध्यक्ष, संयोजन समिती, श्री. ज्ञानेश काळे, समन्वयक, कोल्हापूर विभाग, सौ. पल्‍लवी शिंदे, श्री. मनोहर यादव, सौ. माधवी कोळेकर, सौ. हेमा कोर्टील, श्री. राजेंद्र तोरणे, श्री. महेश त्रिगुणे, श्री. विनोद शिंदे, श्री. चंद्रकांत तोरणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व सातारा जिल्हा बेसबॉल असो.चे पदाधिकारी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment