क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या
निर्देशानुसार विविध स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयामार्फत करण्यात येते. सदर स्पर्धांचे आयोजन संबंधित खेळांच्या एकविध
संघटनांच्या तांत्रिक सहकार्यातून करण्यात येते.
तथापि सायकलिंग,
तायक्वांदो, चायक्वांदो, किकबॉक्सिंग या खेळांच्या राज्यस्तरावर दोन समांतर संघटना कार्यरत असून त्यापैकी
अधिकृत संघटनेबाबत संचालनालयामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. त्याकरिता काही कालावधीची आवश्यकता असल्याने उपरोक्त नमूद खेळांच्या जिल्हास्तर
शालेय स्पर्धा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment