जिल्हा
क्रीडा परिपषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व के.एस.डी. शानभाग
विद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर जवाहरलाल नेहरु हॉकी
क्रीडा स्पर्धेचे दि. २२ ते २४ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत के.एस.डी. शानभाग
विद्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
सदर
स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. रमेश शानभाग, संस्थापक, के.एस.डी. शानभाग विद्यालय,
सातारा यांच्या शुभहस्ते व मा. सौ. रेखा गायकवाड, प्राचार्या, मा. श्री. हितेंद्र
खरात, राज्य हॉकी क्रीडा मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर
स्पर्धेकरिता सातारा जिल्ह्यातून मुला-मुलींचे एकूण १८ संघ उपस्थित होते. या स्पर्धेतून
विजयी झालेले संघांची सांगली येथे होणा-या कोल्हापूर विभागीय जवाहरलाल नेहरु हॉकी
क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :-
15 वर्षाखालील
मुले :-
विजयी संघ :- मुधोजी हायस्कूल, फलटण (२:०)
उपविजयी संघ :- के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा.
तृतीय :- महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा.
17 वर्षाखालील
मुले :
विजयी संघ :- मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण (३:२)
उपविजयी संघ :- सैनिक स्कूल, सातारा.
तृतीय :- मुधोजी हायस्कूल, फलटण, सातारा.
17 वर्षाखालील मुली
:-
विजयी संघ :- मुधोजी हायस्कूल, फलटण (३:२)
उपविजयी संघ :- श्री. शिवाजीराजे इंग्लिश मिडी.
स्कूल, फलटण.
तृतीय :- के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा.
या
स्पर्धेकरिता श्री. अक्षय फरकुटे, श्री. सादिकअली बागवान, श्री. शंतनू जाधव, श्री.
अनिकेत खाडे, श्री. कौस्तुभ बाबर, श्री. यश सुर्वे, श्री. अनिकेत आडागळे, श्री.
कांबळे, श्री. आदित्य सपकाळ, श्री. अक्षय भोईटे, श्री. रुपेश त्रिंबके, श्री. आकाश
धबधबे व श्री. सागर कारंडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
No comments:
Post a Comment