Friday 31 August 2012

जिल्हास्तरिय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत नव्या वयोगटाचा समावेश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने जिल्हास्तरिय शालेय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते ७ सप्टेंबर २०१२ रोजी भारतमाता विद्यालय, मायणी ता. खटाव जि. सातारा येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुले व मुलींचा वयोगट नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. ज्या शाळांना या स्पर्धेमध्ये सहभागी घ्यावयाचा आहे त्या शाळेंनी आपला प्रवेश अर्ज स्पर्धा ठिकाणी घेऊन यावे असे आवाहन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
        जिल्हास्तरिय शालेय नेटबॉल स्पर्धेचा कार्यक्रम खालीलप्रमाणे-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
नेटबॉल
१४ वर्षाखालील मुले मुली
०६ सप्टेंबर २०१२
भारतमाता विद्यालय मायणी ता. खटाव जि. सातारा
१७ वर्षाखालील मुले मुली
१९ वर्षाखालील मुले व मुली


        अधिक महितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी ०२१६२-२३७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोल्हापूर विभागीय नेहरु चषक हॉकी क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या कोल्हापूर विभागीय नेहरु चषक हॉकी क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. स्पर्धेचा कार्यक्रम खालील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
नेहरू चषक हॉकी
१७ वर्षाखालील मुले व मुली
१५ सप्टेंबर २०१२ सकाळी ०९.०० वा
१५सप्टेंबर २०१२
मुधोजी कॉलेज फलटण ता. फलटण जि. सातारा
१५ वर्षाखालील मुले
१६ सप्टेंबर २०१२ सकाळी ०९.०० वा.
१६ सप्टेंबर २०१२

(टिप :- सर्व संघांनी आपली उपस्थिती स्पर्धा ठिकाणीच द्यावी.)
स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या ब्लॉगवर (sataradso.blogspot.in) संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
कार्यालयाचा दुरध्वनी क्र. (०२१६२) २३७४३८
श्री. हितेंद्र खरात (हॉकी क्रीडा मार्गदर्शक) – ९८५०२१४८६४

Wednesday 29 August 2012

जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेच्या तारखा व ठिकाणात बदल.

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित होणार्‍या जिल्हास्तर जलतरण, डाय़व्हींग व वॉटरपोलो क्रीडा स्पर्धांच्या तारखा व स्पर्धा ठिकाणामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आलेला असुन सुधारित तारखा व स्पर्धा ठिकाण खालीलप्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
जलतरण
१४,१७ वर्षाखालील मुले, मुली
६ सप्टेंबर २०१२
संजीवन विद्यालय पाचगणी ता. महाबळेश्वर जि. सातारा
जलतरण
१९ वर्षाखालील मुले,मुली व महिला
०७ सप्टेंबर २०१२
डायव्हींग
१४,१७,वर्षाखालील मुले  मुली
वॉटरपोलो
१९ वर्षाखालील मुले


जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ब्लॉगवर (sataradso.blogspot.in)वरील बदल तसेच जलतरण स्पर्धेचे बाबनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा व   
वरील बदलांची नोंद घेऊन संबंधित शाळांनी आपले खेळाडू स्पर्धा ठिकाणी वेळेवर उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. उदय जोशी यांनी केले आहे.