Saturday 28 December 2013

राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहिर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सातारा, सातारा जिल्हा बेसबॉल असोसिएशन व अनुप शिंदे अण्ड असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय बेसबॉल (१४ वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. २६ ते २८ डिसेंबर २०१३ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले होते. .
            सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या आठ विभागातून मुलांचे ८ व मुलींचे ८ असे एकूण १६ संघ व निवड चाचणीकरिता ८० खेळाडू तसेच ४० संघव्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक सहभागी झालेले होते. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांच्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पुणे विभाग, द्वितीय क्रमांक कोल्हापूर विभाग, तृतीय क्रमांक नाशिक विभाग तसेच मुलींच्यामध्ये प्रथम क्रमांक लातूर विभाग, द्वितीय क्रमांक अमरावती विभाग, तृतीय क्रमांक नाशिक विभागाने पटकविला आहे. सदरच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, मा. श्री. माधव सुर्वे, अध्यक्ष, हेरंब प्रतिष्ठान, सातारा यांच्या शुभहस्ते पदक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आला.
दि. ८ ते ११ जानेवारी २०१४ या कालावधीत रांची (झारखंड) येथे होणा-या ५९वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा प्रातिनिधीक संघ मा. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अशोक सरोदे, ठाणे, श्री. ज्ञानेश काळे, सातारा व सौ. पल्‍लवी शिंदे, सातारा या निवड समिती सदस्यांमार्फत निवडला असून मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संघाची घोषणा केली आहे.
महाराष्टाचा संघ मुले : गणेश खोमणे, जोयेल ठाकूर, स्वप्निल लोदी, विजय चौधरी – पुणे विभाग, ओंकार पवार, अमेय पोळ, तुषार जाधव, अजय पाटील – कोल्हापूर विभाग, स्वप्निल चव्हाण, शाहू देशमुख – नाशिक विभाग, सनद दुबे, अनंत नितनवार – अमरावती विभाग, हर्षल म्हात्रे, चिराग सोनावणे – मुंबई विभाग, शुभम नवले – औरंगाबाद विभाग, ऋषीकेश घोंगडे – लातूर विभाग,
मुली : सना पठाण, ज्योती पवार, स्नेहा देवकर – लातूर विभाग, कादंबरी खापरे, ऋतिका चाटी, पुजा देऊळकर – अमरावती विभाग, जागृती तोमर, योगेश्वरी तोमर – नाशिक विभाग, समृध्दी देसाई, अनुष्का परब – मुंबई विभाग, वैष्णवी थोरात, नमिरा मुजावर – कोल्हापूर विभाग, शिवानी बिराजदार, प्रतिक्षा पवार – पुणे विभाग, भूमी कायते – औरंगाबाद विभाग, विशाखा दास – नागपूर विभाग
            या दोन्ही संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर दि. ०१ जानेवारी २०१४ पासून मुंबई या ठिकाणी होणार असून, तेथून राष्ट्रीय स्पर्धेकरिता संघ रांची (झारखंड) रवाना होणार आहे.

            या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्री. अनुप शिंदे, अध्यक्ष, संयोजन समिती, श्री. ज्ञानेश काळे, समन्वयक, कोल्हापूर विभाग, सौ. पल्‍लवी शिंदे, श्री. मनोहर यादव, सौ. माधवी कोळेकर, सौ. हेमा कोर्टील, श्री. राजेंद्र तोरणे, श्री. महेश त्रिगुणे, श्री. विनोद शिंदे, श्री. चंद्रकांत तोरणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व सातारा जिल्हा बेसबॉल असो.चे पदाधिकारी परिश्रम घेतले.

Wednesday 4 December 2013

जिल्हास्तर शालेय वुडबॉल स्पर्धेंच्या तारखांमध्ये बदल

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर वुडबॉल १४ डिसेंबर २०१३ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते परंतु काही तांत्रीक कारणामुळे या क्रीडा स्पर्धांच्या तारखा व ठिकाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

            या स्पर्धा नविन तारखेनुसार दि. ०९ डिसेंबर २०१३ रोजी कन्या विद्यालय मोही ता. माण जि. सातारा येथे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तरी सहभागी खेळाडू, शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, तसेच अधिक माहितीसाठी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ व कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा

भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या ९ खेळांचे आयोजन

भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खालील नमूद खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासंदर्भात वरील संदर्भिय पत्रान्वये मान्यता दिलेली आहे.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यास खालील 3 खेळांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. रोप स्किपींग, २. सिलम्बम व ३. फूटबॉल टेनिस.
         राज्यस्तरापर्यंत घ्यावयाच्या खालील सहा क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. बेल्ट रेसलिंग, २. फिल्ड आर्चरी, ३. कुडो, ४. पिकल बॉल, ५. सेलिंग, ६. पॉवरलिफ्टींग.
या क्रीडा स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धाच समजल्या जाणार असल्याने उपरोक्त खेळांमधील सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांमधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठीच देण्यात येतील, इतर लाभ जसे ५ टक्के आरक्षण इ.मिळणार नाहीत.
उपरोक्त खेळांच्या स्पर्धांचे जिल्हा, विभाग व राज्य या क्रमाने आयोजन करावयाचे असुन, या स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग sataradso.blogspot.in पहावा.

Tuesday 3 December 2013

राज्यस्तर शालेय स्कॉय (सिकई) मार्शल आर्ट स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४

       
            जिल्हा क्रीडा परिषद, सातारा व सातारा जिल्हा स्कॉय (सिकई) मार्शल आर्ट असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय स्कॉय (सिकई) मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे :
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्कॉय (सिकई) मार्शल आर्ट
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०५ डिसेंबर २०१३ रोजी दु. १२:०० वाजेपर्यंत
०६ ते ०७ डिसेंबर २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा.

अधिक माहितीसाठी :
१.     श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, ९८२२७७६८७७
२.      श्री. तानाजी मॊरे क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८
३.     श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा अधिकारी, ९८९०००४३७५
४.     श्री. अभय चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक, ९४२२०३०३८३
५.     श्री. बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०९६२३४५
६.     श्री. हितेंद्र खरात, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०२१४८६४
व कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व कार्यालयाच्या ब्लॉगवर (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्यात यावा.

कोल्हापूर विभागीय कराटे, रोलबॉल व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने खालील खेळांचे विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सहभागी विद्यालय / महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी श्री. तानाजी मॊरे क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ व कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना द्यावात.
॥ कोल्हापूर विभागीय स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४॥
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
कराटे
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०४ डिसेंबर २०१३ रोजी दु. १२:०० वाजेपर्यंत वजन १२ ते ४ या वेळेत घेण्यात येतील 
०४ डिसेंबर २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा.
रोलबॉल
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ०९:०० वाजेपर्यंत
०७ डिसेंबर २०१३
टेनिस बॉल क्रिकेट
१९ वर्षाखालील मुले व मुली
०८ डिसेंबर २०१३ दु.०४:०० वा
०९ ते १० डिसेंबर २०१३


Tuesday 26 November 2013

जिल्हास्तर शालेय टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद, सातारा व सातारा जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजन करण्यात आलेले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातून मुलांचे २० तर मुलींच्या 04 विद्यालय / महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविलेला होता.
            सदर क्रीडा स्पर्धा या बाद पध्दतीने पार पाडण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेच्या मुलांचा अंतिम सामना धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा व राजेंद्र विद्यालय खंडाळा यांच्यामध्ये पार पडला. यामध्ये धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा विजयी झाले तर मुलींच्या सामन्यामध्ये वेणुताई गर्ल्स हाय. फलटने प.म.शिंदे कन्या विद्यालय, दहिवडीवर विजय प्राप्त केला.

            स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघांना मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी व श्री. विरभद्र कावडे, सचिव, सातारा जिल्हा टेनिस बॉल असो. सातारा, यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. याप्रसंगी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्री. जांभळे, श्री. मनोज मोरे, श्री, महेश बडवे, श्री. शशिकांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती     

Wednesday 20 November 2013

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद, सातारा.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१३-१४
अक्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
वुशु
१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
२१ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
थांगता
१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
२२ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
टेनिस बॉल क्रिकेट
१९ वर्षाखालील मुले व मुली
२२ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
जंम्प रोप
१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली
२५ नोव्हेंबर २०१३
स्व. शे. लाहोटी कन्या शाळा कराड ता. कराड
श्री. मोरे
सेपाक टकरा
१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ नोव्हेंबर २०१३
संत गाडगे महाराज आश्रमशाळा खराडवाडी ता. फलटण
श्री. मोरे
टेनिक्वाईट
१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ नोव्हेंबर २०१३
संत गाडगे महाराज आश्रमशाळा खराडवाडी ता. फलटण
श्री. मोरे
रस्सीखेच
१९ वर्षाखालील मुले व मुली
२८ नोव्हेंबर २०१३
महाराजा सयाजीराव विद्या. सातारा
श्री. मोरे
स्वॅश
१७ वर्षाखालील मुले व मुली
२९ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
कराटे
१७,१९ वर्षाखालील मुले
३० नोव्हेंबर २०१३ (मुले)
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
१७,१९ वर्षाखालील मुली
०१ डिसेंबर २०१३ (मुली)
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
१०
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षाखालील मुले व मुली
०४ डिसेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
११
टेनिस व्हॉलीबॉल
१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
१० डिसेंबर २०१३
बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण ता. पाटण
श्री. मोरे
१२
वुडबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
१४ डिसेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
१३
शुटिंग व्हॉलीबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
१६ डिसेंबर २०१३
हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगाव ता. खटाव
श्री. मोरे

 अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८, तसेच  sataradso@blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.