Sunday 24 January 2016

जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१५

जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१५

            मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, सातारा यांच्या अध्यक्षते खाली नियुक्त मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापुर विभाग, मा. जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा, श्री. विश्वतेज मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार्थी व श्री. अमोल पालेकर, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या निवड समिती सदस्यांमार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून सन २०१५ करिता गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार्थींची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,रोख रक्कम रु.१०,०००/- असे आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण मा.ना.श्री.विजय शिवतारे, राज्यमंत्री, जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्ये तथा पालकमंत्री,सातारा यांच्या शुभ हस्ते दि.२६ जानेवारी, २०१६ रोजी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर होणार आहे.
सन २०१५ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे: 
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग )
è शिवराज प्रदिप ससे (नेमबाजी) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कार. (थेट पुरस्कार)
           दि. ११ ते २४ जानेवारी, २०१२ या कालावधीत दोहा (कतार) येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या आशियाई कनिष्ठ गट नेमबाजी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन, ०३ सुवर्ण व ०२ रौप्य पदक संपादन केलेल आहेत. सन २०१३-१४ मध्ये आयोजित ५८ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट स्पर्धा, पुणे व ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स्‍), केरळ यामध्ये रौप्य व कास्य पदक संपादन केलेले आहे. तसेच त्याने अनेक राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य संपादन केले आहे

è अनिकेत विकास पवार (मल्‍लखांब) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
           सन २०१३-१४ वर्षात आयोजित करण्यात आलेल्या २८ व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय मल्‍लखांब क्रीडा स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक संपादन केलेला आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग )
è कु. एकता दिलीप शिर्के (धनुर्विद्या) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
            २१ व २२ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक संपादन केले. १०,११,१२ व १३ व्या वरिष्ठ गट राज्य धनुर्विद्या अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत कास्य,रौप्य,सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. तसेच ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये (नॅशनल गेम्स्‍) प्रथक क्रमांक संपादन केलेला आहे.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
è श्री. चंद्रहास उर्फ मनोज लक्ष्मण कान्हेरे (बॅडमिंटन): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
            सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्यावतीने बॅंडमिंटन खेळाचे अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देत असून, त्यांनी अनेक विविध स्तरावरील खेळाडू निर्माण केलेले आहेत. निलेश फनसळकर, विक्रम पवार, वैभव अंबिके अतुल पाटील, दिग्विजय पवार, ओंकार पवार, सत्यजित जगधने, हर्ष जगधने, अक्षय कदम इ. खेळाडूंनी वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य संपादन केलेले आहे.

गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार :
è श्री.ललित मनोहर सातघरे ( टेबल टेनिस ): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
सातारा जिल्ह्यात टेबल टेनिस या खेळाचा,चर्चासत्र व प्रात्यक्षिकांच्या आयोजना द्वारे प्रचार व प्रसार केला. सातारा जिल्हा टेबल टेनिस संघटनेवर खजिनदार व सचिव म्हणून काम केले. टेबल टेनिस खेळाच्या ८ जिल्हास्तर,१ विभागस्तर व १ राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन केले.सातारा जिल्हा वरीष्ट गटाच्या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून त्यांनी ९ वर्ष काम केले.सन २००७ पासून कै.सुधीर माजगावकर क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडूंना टेबल टेनिस खेळातील अद्ययावत असे रोबोद्वारे प्रशिक्षण देत आहेत.
उपरोक्त पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन व पुरस्कारार्थींनी जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.
००००००

Thursday 14 January 2016

ऑलिम्पिक पदक विजेते कै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी सत्कार होणा-या खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांची यादी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा.
ऑलिम्पिक पदक विजेते कै.पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्राविण्य प्राप्त
खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार समारंभास पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यादी
कार्यक्रम: दिनांक १५ जानेवारी २०१६, दुपारी ०४:३० वाजता,
                                                     स्थळ : श्रीमंत  छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा.
अक्र
खेळाडूचे नाव
खेळ बाब
स्पर्धेचे नाव
शासकीय / संघटना
स्पर्धा कालावधी
प्राविण्य
चैत्राली कालिदास गुजर
मैदानी
२ -या, एशियन शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, वुहान (चीन)
शासकीय
२७ जुन ते २ जुलै २०१५
आ.रा.खे.सहभाग
६० वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,रांची,
झारखंड
१९ ते २३ जानेवारी २०१५
प्रथम
ऋतुजा जयवंत पवार
बास्केटबॉल
४ थ्या फ़िबा एशिया कप चॅम्पियनशिप स्पर्धा,मेडन,इंडोनेशिया
संघटना
२ ते १० ऑगस्ट २०१५
आ.रा.खे.सहभाग
सावंत स्वप्निल साहेबराव
मैदानी
ऑल इंडिया इंटर विद्यापीठ स्पर्धा,
कर्नाटका
विद्यापीठ
१६ ते २० जानेवारी २०१५
प्रथम
निकिता राजाराम जाधव
मंल्लखांब
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांगली
शासकीय
९ ते ११ जाने, १५
प्रथम
तेजस्विनी अशोक मोरे
ऑल इंडिया इंटर विद्यापीठ स्पर्धा,
ग्वालीयर
विद्यापीठ
१५ ते १९ डिसेंबर २०१४
प्रथम
वर्षा शामसुंदर मोरे
प्रथम
प्रियांका लक्ष्मण मोरे
प्रथम
संध्या उत्तम मोरे
२८वी सब ज्युनि. राष्ट्रीय अजिंक्यपद.
स्पर्धा,भोपाळ
संघटना
२१ ते २३ मार्च २०१५
प्रथम
इंगळे काजल सतिश
कुस्ती
राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धा, रांची (झारखंड).
शासकीय
२५ ते २८ फ़ेब्रुवारी १५
तृतीय
१०
कुणाल हणमंत ससे
रायफ़ल शुटींग
६० वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पुणे
शासकीय
६ ते ९ मे, २१५
प्रथम
११
गोरे कस्तुरी राजेंद्र
तृतीय
१२
कोकरे विशाल नवनाथ
ज्युदो
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्ली
शासकीय
२ ते ८ जाने, २०१५
तृतीय
१३
शुभम दशरथ इंगळे
धनुर्विद्या
३५ वी सब ज्युनि.
राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्यपद,झारखंड
संघटना
२० ते २६ जानेवारी २०१५
तृतीय




१४
अंकिता अरूण जाधव
तेंग-सू-डो
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्ली
शासकीय
२ ते ८ जाने, १५
तृतीय
१५
राहुल राजेंद्र सावंत
द्वितीय
१६
मयुरी राजू जाधव
द्वित्तीय
१७
ऎश्वर्या निवास गायकवाड
तृतीय
१८
नेहा सुभाष पाटील
द्वितीय
१९
ऎश्वर्या शा.शिंदे
तृतीय
२०
किरण लालसिंग सावंत
जीत-कूने-दो
६० वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,दिल्ली
शासकीय
२ ते ८ जाने, १५
तृतीय
२१
अपूर्वा सुरेश मुद्रावळे
तृतीय
२२
पवन दिपक सोळवंडे
द्वितीय
२३
भोसले वैष्णवी बाळासो
चॉकबॉल
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोंडा,गोवा
शासकीय
२९ डिसेंबर ते २ जानेवारी २०१५
द्वित्तीय
२४
इशिका दत्तात्रय सुर्यवंशी
रोलबॉल
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, छतीसगड
शासकीय
५ ते ९ जाने, २०१५
प्रथम
२५
नेहा धनंजय कुलकर्णी
प्रथम
२६
प्रतिक मोहन राऊत
प्रथम
२७
एम.अजर मुल्ला
६ वी राष्ट्रीय अजिक्यपद.स्पर्धा,इंदोर
संघटना
२ ते ४ जाने, २०१५
तृतीय
२८
पवार समिक्षा सतिश
सेपकटकरा
१७ वी सब ज्युनि.
राष्ट्रीय अजिंक्यपद,
आंध्रप्रदेश.
संघटना
११ ते १४ जाने, १५
द्वित्तीय
२९
पोळ स्नेहल अजय
द्वित्तीय
३०
कट्टे प्रणोती दत्तात्रय
द्वित्तीय
३१
कुलकर्णी मृणाल चंद्रशेकर
द्वित्तीय
३२
घाडगे मेघा लक्ष्मण
द्वित्तीय
३३
कट्टे प्रतिक्षा तात्यासो
द्वित्तीय
३४
पालसांडे मानसी शांताराम
द्वित्तीय
३५
काळे विशाखा विजय
द्वित्तीय
३६
केंगार साक्षी शंकर
द्वित्तीय
३७
जगदाळे आदित्य अजित
द्वित्तीय
३८
दडस अपेक्षा अनिल
सेपकटकरा
२५ वी वरीष्ट राष्ट्रीय अजिंक्यपद,उत्तर प्रदेश
संघटना
३० ऑक्टों ते २ नोव्हें.२०१४
तृतीय
३९
खरात साक्षी विजयकुमार
तृतीय
४०
पवार वैष्णवी अंकुश
तृतीय
४१
गाडवे रक्षंदा विकास
वुशू
६०वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, मध्य प्रदेश

शासकीय
१९ ते २३ नोव्हेंबर २०१४
तृतीय
४२
ऋतुजा मारुती चव्हाण
कुडो
६०वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, झारखंड
शासकीय
१५ ते १७ नोव्हेंबर २०१४
प्रथम
४३
वैष्णवी संदेश पिसाळ
द्वितीय
४४
तुषार निवास पवार
किक बक्सिंग
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्ली
शासकीय
२ ते ८ जाने, २०१५
द्वितीय
४५
निधी हेमंत जगताप
किक बॉक्सिंग
कॅडेट व वरिष्ठ राष्ट्रीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद ,फ़रीदाबाद
संघटना
१७ ते २१ डिसेंबर २०१४
द्वितीय
४६
आकाश आबासाहेब धनवडे
द्वितीय
४७
रुषभ विरभद्र कावडे
स्कवाय
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्ली
शासकीय
२ ते ८ जाने, २०१५
तृतीय
४८
वरूण  सतीश आंग्रे
स्क्वाय
१५ वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, मैसुर, (कर्नाटका)
संघटना
३० नोहें ते २ डिसेंबर २०१५
द्वितीय
४९
शिंदे आदित्य मारुती
तृतीय
५०
गणेश चंद्रकांत केंजळे
तृतीय
५१
प्रियांका दत्तू खरात
टेनिक्वॉईट
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तामिळनाडू
शासकीय
२६ ते ३०
डिसेंबर, २०१४
तृतीय
५२
सौरभ संजय नवले
बेसबॉल
६०वी शालेय राष्ट्रीय
क्रीडा स्पर्धा, छत्तीसगड
शासकीय
२७ ते ३१ डिसें.२०१४
तृतीय
५३
ओंकार सुनिल पवार
तृतीय
५४
सौरभ महादेव गायकवाड
तृतीय
५५
चव्हाण अभिषेक भरत
१५ ते १९ जाने १४
द्वितीय
५६
नेहा शांतिनाथ सुळ
स्पीड बॉल
६०वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांबा,
जम्मु-कशमिर
शासकीय
४ ते ७ फ़ेब्रुवारी २०१५
तृतीय
५७
सोनाली उंत्तम भोसले
तृतीय
५८
मेघणा नारायण बाबर
तृतीय
५९
आदित्य तुळशिराम पवार
आश-ते-डू (आखाडा)
९व्या राष्ट्रीय आशतेडू(आखाडा)
अजिक्यपद, हरीयाणा
संघटना
३० जानेवारी ते ०१ फ़ेब्रुवारी २०१५
प्रथम
६०
रोहित विठ्ठल लिलिंगे
द्वितीय
६१
शिवाजी महादेव पवार
तृतीय
क्रीडा मार्गदर्शकांचा यादी
स्वप्निल ज्ञानदेव पाटील
व्हॉलीबॉल
३७ व्या सब ज्युनि.
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा,नवी दिल्ली
संघटना
२६ ते २९ डिसेंबर २०१४
--
कुंभार सुरेश जयसिंगराव
वेटलिफ्टिंग
८ वी सब ज्युनि. राष्ट्रीय स्पर्धा दिल्‍ली
संघटना
११ ते १५ मार्च,
२०१५
--
भोईटे लता चंद्रकांत
सेपक टकरा
६० वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, हैद्राबाद,
शासकीय
१६ ते २० डिसेंबर २०१४
--
काळे ज्ञानेश सोपान
स्पीड बॉल
६० वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांबा,जम्मू
-काश्मीर
शासकीय
४ ते ७ फेब्रुवारी २०१५
--