Saturday 29 June 2013

शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रम आयोजन-२०१३-१४.

शालेय क्रीडा स्पर्धा २०१३-१४ आयोजन तालुकानिहाय बैठकीचा कार्यक्रम 
            सन २०१३-१४ या वर्षातील तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तालुका निहाय बैठका आयोजन करण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये खालील नमूद विषयांवर चर्चा होणार आहे.
१.        स्पर्धा आयोजनाची नियमावली.               २.        विविध योजनांची माहिती असणारी स्पर्धा पुस्तिका.
३.        तालुका जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतची स्थळे व आयोजनास इच्छुक संस्था/शाळा
४.        तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा वेळापत्रक.
५.        स्पर्धा आयोजन खर्चाबाबत माहिती, चर्चा व अडचणी. ६.    आयत्या वेळचे विषय.
तालुकानिहाय बैठकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे :
अक्र
बैठकीचे ठिकाण व संपर्क क्रमांक
समाविष्ट तालुके
बैठक दिनांक
बैठक वेळ
श्री.. शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
सातारा, कोरेगाव, जावली
१० जुलै २०१३
सकाळी ११.०० वा.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई ता. वाई जि. सातारा.
श्री. मोरे - ९५६११९९७५२
वाई,खंडाळा,
महाबळेश्वर
११ जुलै २०१३
सकाळी ११.०० वा.
स्व. रा. की. लाहोटी कन्या शाळा, कराड ता. कराड जि. सातारा.
श्री. भोसले- ९८५०८९९१००
कराड
१२ जुलै २०१३
दुपारी २.०० वा.
माने-देशमुख विद्यालय, पाटण, ता. पाटण जि. सातारा.
श्री. कुंभार- ९८८११७९०८६
पाटण
१२ जुलै २०१३
सकाळी १०.०० वा.
मुधोजी हायस्कुल, फलटण ता. फलटण  जि. सातारा.
श्री. धुमाळ - ९८९०३८२२०४
फलटण
१५जुलै २०१३
सकाळी ११.०० वा
लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल, खटाव ता. खटाव जि. सातारा.
श्री. पवार - ९४२३२६४७९९
माण, खटाव
१६ जुलै २०१३
सकाळी ११.०० वा
सन २०१२-१३ या वर्षात आपल्या संस्था/शाळा, महाविद्यालयामार्फत सर्व शालेय, ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा आयोजन तथा नियोजना करिता अनमोल असे मार्गदर्शन तसेच सहकार्य प्राप्त झाल्याने सर्व शालेय, ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशस्वीरित्या पार पडलेले आहे, याबद्दल जिल्हा क्रीडा परिषद, साताराच्या वतीने आपले आभार व्यक्त व्यक्त करण्यात येत आहेत.
सन २०१३-१४ यावर्षीही अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे, या वर्षाच्या शालेय, ग्रामीण,महिला व इतर क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व वातावरण मिळवून देण्याचा व त्यांची कारकीर्द पुढे उज्ज्वल करण्यासाठी आपण मिळून चांगले प्रयत्न करुन सातारा जिल्ह्याचे नांव उज्ज्वल होईल, अशी कामगिरी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी आपण पत्रावर नमूद केलेल्या इ-मेल आय.डी.वर कोणत्याही अडचणी संदर्भात संपर्क केल्यास त्याचे उत्तर आपणांस ताबडतोब देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच शाळा/महाविद्यालयांचे इ-मेल आय.डी. देखील देण्याची व्यवस्था करावी.

Thursday 27 June 2013

व्यायाम साहित्य पुरवठा निविदा सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा.
व्यायाम साहित्य पुरवठा निविदा सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा हे स्थानिक विकास निधींतर्गत असलेल्या कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून त्यांच्याकडे प्राप्त होणार्‍या संभाव्य निधीतून व्यायाम साहित्य पुरवठा दरकरार करण्यासाठी सीलबंद निविदा मागवित आहेत. या कामाच्या कोर्‍या निविदांचा संच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा-४१५००१ (दूरध्वनी क्रमांक-०२१६२-२३७४३८) याठिकाणी दि.२४/०६/२०१३ ते दि.०८/०७/२०१३ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध असतील. कोर्‍या निविदा संचाच्या मागणीसाठी पुरवठादारांनी नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडून व नापरतावा निविदा शुल्क रू.५००/- (रोख अथवा डी.डी.) भरणा करुन प्राप्त करुन घेता येतील.
निविदा भरुन सादर करण्याची अंतिम तारीख दि.१२/०७/२०१३  रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत राहील. तद्‌नंतर आलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त निविदा शक्य झाल्यास त्याच दिवशी सायंकाळी ०४.०० वाजता उघडण्यात येतील.
अ.क्र.
कामाचा तपशील
अंदाजित रक्कम वार्षिक
निविदा शुल्क (ना-परतावा)
कंत्राटदार तपशील
१.
सातारा जिल्ह्यात स्थानिक विकास निधींतर्गत अथवा इतर योजनांतर्गत व्यायाम व इतर उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी दरकरार करणे
निधी उपलब्धते
नुसार
रु.५००/-

सुरक्षा ठेव : रु.१०,०००/-
व्यायामसाहित्य तयार करणे व पुरवठा करणे. याबाबीचा अधिकृत पुरवठादार
कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारणे अथवा नाकारणेचा सर्व अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा  हे राखून ठेवीत आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी,
सातारा.
क्र.स्थाविका/व्याशासा/निविदा/(१)/१३-१४/

००००००