Tuesday 26 November 2013

जिल्हास्तर शालेय टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद, सातारा व सातारा जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजन करण्यात आलेले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातून मुलांचे २० तर मुलींच्या 04 विद्यालय / महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविलेला होता.
            सदर क्रीडा स्पर्धा या बाद पध्दतीने पार पाडण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेच्या मुलांचा अंतिम सामना धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा व राजेंद्र विद्यालय खंडाळा यांच्यामध्ये पार पडला. यामध्ये धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा विजयी झाले तर मुलींच्या सामन्यामध्ये वेणुताई गर्ल्स हाय. फलटने प.म.शिंदे कन्या विद्यालय, दहिवडीवर विजय प्राप्त केला.

            स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघांना मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी व श्री. विरभद्र कावडे, सचिव, सातारा जिल्हा टेनिस बॉल असो. सातारा, यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. याप्रसंगी श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्री. जांभळे, श्री. मनोज मोरे, श्री, महेश बडवे, श्री. शशिकांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती     

Wednesday 20 November 2013

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद, सातारा.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१३-१४
अक्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
वुशु
१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
२१ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
थांगता
१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
२२ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
टेनिस बॉल क्रिकेट
१९ वर्षाखालील मुले व मुली
२२ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
जंम्प रोप
१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली
२५ नोव्हेंबर २०१३
स्व. शे. लाहोटी कन्या शाळा कराड ता. कराड
श्री. मोरे
सेपाक टकरा
१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ नोव्हेंबर २०१३
संत गाडगे महाराज आश्रमशाळा खराडवाडी ता. फलटण
श्री. मोरे
टेनिक्वाईट
१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ नोव्हेंबर २०१३
संत गाडगे महाराज आश्रमशाळा खराडवाडी ता. फलटण
श्री. मोरे
रस्सीखेच
१९ वर्षाखालील मुले व मुली
२८ नोव्हेंबर २०१३
महाराजा सयाजीराव विद्या. सातारा
श्री. मोरे
स्वॅश
१७ वर्षाखालील मुले व मुली
२९ नोव्हेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
कराटे
१७,१९ वर्षाखालील मुले
३० नोव्हेंबर २०१३ (मुले)
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
१७,१९ वर्षाखालील मुली
०१ डिसेंबर २०१३ (मुली)
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
१०
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षाखालील मुले व मुली
०४ डिसेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
११
टेनिस व्हॉलीबॉल
१७, १९ वर्षाखालील मुले व मुली
१० डिसेंबर २०१३
बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण ता. पाटण
श्री. मोरे
१२
वुडबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
१४ डिसेंबर २०१३
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. मोरे
१३
शुटिंग व्हॉलीबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
१६ डिसेंबर २०१३
हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगाव ता. खटाव
श्री. मोरे

 अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर व श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८, तसेच  sataradso@blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Tuesday 19 November 2013

जिल्हास्तर चायक्वांदो क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४.

            जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर शालेय चायक्वांदो ( १९ वर्षाखालील मुले व मुली ) क्रीडा स्पर्धेचे आयोजन  दि. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी १०:०० वा. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे. तरी सर्व  खेळाडू / शाळा / महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या दूरध्वनी क्रमांकावर व satatadso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधवा. 
१९ वर्षाखालील मुले व मुलीकरिता वजनगट पूढील प्रमाणे :


१.     ४२ ते ४५ किलो खालील
२.     ४५ ते ४८ किलो खालील
३.     ४८ ते ५१ किलो खालील
४.     ५१ ते ५४ किलो खालील
५.     ५४ ते ५७ किलो खालील
६.     ५७ ते ६० किलो खालील
७.     ६० ते ६३ किलो खालील
८.    ६३ ते ६६ किलो खालील

९.     ६६ किलो वरील खालील

कोल्हापूर विभागीय शालेय सिकई मार्शल आर्ट व पायका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४

खेळाडूंच्या उपस्थितीबाबतची माहिती श्री. तानाजी मॊरे क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ व कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना द्यावात, अशी विनंती आहे.

अक्र
वयोगट
खेळ
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४ ,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
सिकई मार्शल आर्ट
२३ नोव्हेंबर २०१३ दू. १२:०० वा. (दू. १२ ते ४ वाजेपर्यंत वजन घेण्यात येईल.
२४ नोव्हेंबर २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता.जि. सातारा.
१६ वर्षाखालील मुले व मुली निवड चाचणी
व्हॉलीबॉल
२७ नोव्हेंबर २०१३ स ०८:०० वा
२७ नोव्हेंबर २०१३
प. म. शिंदे कन्या शाळा दहिवडी ता. माण जि. सातारा