Thursday 26 June 2014

तालुकास्तर व जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचणी सन २०१४-१५ कार्यक्रम जाहीर

              शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीत सन २०१४-१५ या वर्षाकरिता नविन प्रवेश देण्यासाठी ८ ते १४ वर्ष वयोगटातील शालेय शिक्षण घेत असलेल्या व नसलेल्या मुला-मुलींच्या १. वजन, २. उंची, ३. ३० मी भरधाव धावणे, ४. ८०० मी धावणे, ५. ६ x १० मी शटल रन, ६. उभे राहून लांब उडी, ७. उभे राहून उंच उडी, ८. मेडीसीन बॉल थ्रो, ९. लवचिकता या चाचण्या घ्यावयाच्या आहेत.
            वरील नमूद प्रत्येक चाचणीस अधिकतम ३ गुण असून, या नऊ चाचण्या दिल्यानंतर मुला-मुलींच्या गुणवत्तेनुसार जे मुले-मुली १७ किंवा अधिक गुण संपादन करतील अशा मुला-मुलींना तालुकास्तर नैपुण्य चाचणीसाठी प्रवेश दिला जाईल.

            आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या शालेतील क्रीडा शिक्षकांच्या मदतीने क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे शाळास्तरावर आयोजन दि. ०७ जुलै २०१४ च्या आत करुन, पात्र मुला-मुलींना तालुकास्तर चाचण्यांसाठी पाठवावे. तालुकास्तर व जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचणीचा कार्यक्रम पूढील प्रमाणे असून सकाळी ठीक ०९:०० वा. चाचण्या सुरु करण्यात येतील याची दक्षता घेण्यात यावी.

.क्र
तालुक्याचे नाव
स्थळ
दिनांक
जावली
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
१५ जुलै २०१४
खंडाळा
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा
१६ जुलै २०१४
सातारा
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
१७ जुलै २०१४
पाटण
बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण ता. पाटण
१८ जुलै २०१४
कोरेगाव
डि.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव ता. कोरेगाव
१८ जुलै २०१४
माण
सिंध्दनाथ मेघा सिटी, म्हसवड, ता.माण
१९ जुलै २०१४
खटाव
श्री.लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कुल, खटाव ता. खटाव
२० जुलै २०१४
महाबळेश्वर
अंजुमन इस्लाम पब्लीक स्कुल, पाचगणी ता.महाबळेश्वर
२० जुलै २०१४
फ़लटण
तालुका क्रीडा संकुल,जाधववाडी, ता.फ़लटण
२१ जुलै २०१४
१०
वाई
किसनवीर महाविद्यालय, वाई ता. वाई
२२ जुलै २०१४
११
कराड
वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड ता. कराड
२२ जुलै २०१४
सातारा जिल्हास्तर
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
२५ ते २६ जुलै २०१४

तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. (०२१६२)२३७४३८ व ब्लॉग  sataradso.blogspot.in यावर संपर्क साधावा.

Friday 20 June 2014

सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल (ज्युनियर व सबज्युनियर) स्पर्धांचे आयोजन,२०१४-१५

सन २०१४-१५ मधील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांतर्गत राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल (ज्युनियर व सबज्युनियर) स्पर्धांचे आयोजन  सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस्‍ एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली मार्फत दि.१५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर, २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धांचे आयोजन दि.०५ ऑगस्ट, २०१४ पूर्वी होणे अपेक्षित असल्याने, या स्पर्धांचे आयोजन त्वरीत करणे आवश्यक आहे.
त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सातारा मार्फत सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल (ज्युनियर व सबज्युनियर) स्पर्धांचे आयोजन खालील नमूद वेळापत्रक, वयोगटानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अ.क्र.
वयोगट
जन्मतारीख
स्पर्धा कालावधी
प्रवेश अर्ज अंतिम दिनांक
स्पर्धा स्थळ व संपर्क क्रमांक
१.
१४ वर्षाखालील मुले (सब-ज्युनियर)
दि.०५.१०.२००० किंवा त्यानंतर जन्म
०२ ते ०५ जुलै, २०१४
दि.३० जून, २०१४.
कार्यालयीन वेळेत
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, एस.टी.स्टॅण्डजवळ सातारा. श्री.धारुरकर, क्रीडा अधिकारी-८२७५२०६८७९
२.
१७ वर्षाखालील मुली (ज्युनियर)
दि.१५.१०.१९९७ किंवा त्यानंतर जन्म
०६ व ०७ जुलै, २०१४
३.
१७ वर्षाखालील मुले (ज्युनियर)
दि.२२.१०.१९९७ किंवा त्यानंतर जन्म
०८ ते ११ जुलै, २०१४
            उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल (ज्युनियर व सबज्युनियर) स्पर्धांसाठी आपल्या शाळा/महाविद्यालयांच्या संघांची नोंदणी प्रति संघ ` ११५/- इतके शुल्क भरुन करावी,अशी विनंती आहे.

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फूटबॉल क्रीडा स्पर्धा २०१४-१५