जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमावली

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शिछपु-२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२, दि.०१ ऑक्टोबर, २०१२ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-२००१ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप रोख रु.१०,०००/-, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे, दरवर्षी अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला), यातील पात्र ठरणा-या क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता व खेळाडू यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी खालील नमूद तपशीलानुसार अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावा. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शिछपु-२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२, दि.०१ ऑक्टोबर, २०१२ डाऊनलोड करुन घेण्यासाठी कृपया क्लिक करावे (डाऊनलोड झालेल्या शासन निर्णयातील पृष्ट क्र.३४ ते ४१)


जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन घ्या





No comments:

Post a Comment