Friday 26 December 2014

राज्यस्तर शालेय ट्रेडीशनल क्रीडा स्पर्धा २०१४-१५


॥ राज्यस्तरीय शालेय ट्रेडीशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धा कार्यक्रम ॥ 
१.
स्पर्धा स्थळ,निवास व भोजन व्यवस्था
:
अक्षता मंगल कार्यालय, आगाशिव नगर, मलकापूर ता. कराड
२.
स्पर्धा कालावधी
:
दि. ०२ ते ०३ जानेवारी, २०१५.
३.
उपस्थिती
:
दि. ०२ जानेवारी, २०१५ रोजी दु. ०३:०० वाजेपर्यंत.
४.
खेळाडूंचे वजन
:
दि. ०२ जानेवारी, २०१५ रोजी दु. ०३:३० ते ०५:३० वाजेपर्यंत.
१.                 संपर्क    : श्री. टी.ए.मोरे, क्री.अ.-९७६४२७४१३८, श्री.धारुरकर, क्री.अ.-८२७५२०६८७९,    श्रीमती मनिषा पाटील, क्री.अ.-७५८८४६१६८८.  संघटना प्रतिनिधी : श्री. गणेश पवार- ७७४४९४८६३१, ८४८४८४८११८, श्री. अमोल साठे-९९२२६३६७८२.

Monday 22 December 2014

जिल्हातर शालेय लंगडी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५


 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हातर शालेय लंगडी स्पर्धेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
लंगडी
१९ वर्षाखालील मुले व मुली
२३ डिसेंबर , २०१४ रोजी सकाळी ०९.०० वा
२३ डिसेंबर , २०१४
माणदेशी मैदान, मेघासिटी म्हसवड ता. माण जि. सातारा

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत. व अधिक महितीसाठी श्री. उदय जाधव,स्पर्धा आयोजक ९४२३९७३७९२ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Tuesday 16 December 2014

खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार करणेबाबत.


           आपणांस विदीतच आहे की, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी १५ जानेवारी या ऑलम्पिकवीर कै.पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना, राष्ट्रीय स्पर्धेस महाराष्ट्र राज्याच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केलेल्या क्रीडा मार्गदर्शकांना व राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा ट्रॅकसूट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो.
           दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी सन २०१३-१४ (०१ जुलै, २०१३ ते ३० जुन,२०१४) या  वर्षात शालेय, ग्रामीण, महिला व एकविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या, तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू, राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडू / कार्यकर्ते व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता नियुक्त मार्गदर्शक यांनी प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह आपले अर्ज दि.०५ जानेवारी, २०१५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे सादर करावेत .

          तसेच एकविध संघटनांच्या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी सातारा जिल्हा संघटनेच्या शिफ़ारशीसह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२१६२-२३७४३८ या क्रमांकावर किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री.उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.

Friday 12 December 2014

क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उदघाटन सन २०१४-१५

क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उदघाटन सन २०१४-१५

             जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा द्वारा क्रीडा सप्ताहा निमीत्य दि.१२ ते १८ डिसेंबर २०१४ या कालावधीत श्रीमंत छ.शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजीत होत असलेल्या क्रीडा सप्ताहा निमीत्य दिनांक १२ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:३० वा.सातारा शहरातील प्रमुख रसत्यावरुन २५० खेळाडुनी संचलन केले.यानंतर सप्ताहाचे उदघाटन श्री.आर वाय जाधव (अध्यक्ष,सातारा जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना ) यांच्या शुभ हस्ते श्रीमंत छ.शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे झाले,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री योगेश मुंदडा( सचिव,सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन) हे होते.या प्रसंगी श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा,श्री कालीदास गुजर,श्री रवी यादव, श्री फ़रांदे विश्वनाथ,श्री विजय खंडाईत,श्री राहुल मोरे तसेच विवीध खेळ संघटनांचे प्रतिनीधी ई.उपस्थीत होते.उदघाटना नंतर गुरुकुल स्कुल व के एस डी शानभाग विद्यालयाच्याच्या विद्यार्थांनी राष्ट्र भक्तीपर गायन सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धारुरकर सुनिल (क्रीडा अधिकारी) यानी तर आभार श्री. तानाजी मोरे(क्रीडा अधिकारी) यानी मानले.

         दि.१३ रोजी सातारा जिल्ह्यातील विवीध शाळातील विद्यार्थी भारतीय पारंपारीक व्यायाम प्रकार व खेळाचे प्रदर्शन आणि लोकनृत्याचे सादरीकरण करणार आहेत. क्रीडा सप्ताहा निमीत्य आयोजीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.



Wednesday 10 December 2014

जिल्हास्तर युवा महोत्सव सह्भाग घेणे बाबत

मा.प्राचार्य / मुख्याध्यापक
------------------------ ता.---------------जि.सातारा

                                                                        
जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहान
युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी सुप्त कलागुणांचे सादरी करण होण्यासाठी युवा महोत्सावाचे आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या आदेशान्व्ये १५ ते ३५ वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक १६/१२/२०१४ रोजी साकाळी ९.०० वा जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे करण्यात येत आहे.
युवा महोत्सावा करीता खालील प्रकार व संख्या व वेळ पुढील प्रमाणे
अ.क्र.
कला प्रकार
कलाकार संख्या
वेळ
लोकनृत्य
२० साथीदारा सह
१५ मिनिटे
लोकगीत
२० साथीदारा सह
७ मिनिटे
एकांकिका ( इंग्रजी / हिंदी )
१२
४५ मिनिटे
बासरी
१५ मिनिटे
तबला
१० मिनिटे
सतार
१० मिनिटे
मृदंग
१० मिनिटे
हार्मोनियम
१० मिनिटे
शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम
१५ मिनिटे
१०
वक्तृव हिंदी / इंग्रजी
४ मिनिटे
११
शास्त्रीय गायन
१५ मिनिटे
१२
विणा
१५ मिनिटे
१३
गीटार
१० मिनिटे
१४
मनिपुरी नृत्य
१५ मिनिटे
१५
ओडीसा नृत्य
१५ मिनिटे
१६
भरत नाटयम
१७
कुचीपुडी नत्य
१५ मिनिटे
१८
कथ्थक
१५ मिनिटे



जिल्हास्तर युवा महोत्स्वानंतर  विभागस्तर युवा महोत्साव व त्या नंतर राज्यस्तर युवा महोत्साव होणार आहे.सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिक्षण घेणारे,शिक्षण पुर्ण झालेले,कला अद्यापन,विध्यार्थी नाट्य मंडळातील कलाकार या सर्वासाठी हे कलामंच खुले आहे.या महोत्सावातील कला प्रकारासाठी प्रवेश  विनामुल्य असुन प्राविण्य संपादन करणारे कलाकार व सहभागी कलाकारांना शासनाचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे

Monday 8 December 2014

जिल्हास्तर शालेय चॉकबॉल क्रीडा स्पर्धा २०१४ वयोगट १९ वर्षे मुले व मुली


१.
उपस्थिती दिनांक
:
११ डिसेंबर २०१४ सकाळी ९.०० वाजेपर्यंत.
२.
स्पर्धा दिनांक
:
११ डिसेंबर २०१४
३.
स्पर्धा ठिकाण
:
सरदार वल्लभ भाई  हायस्कुल साखरवाडी ता.फलटण
६.
संपर्क
:
श्री  उदय जाधव ९४२३९७३७९२

उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपल्या जिल्ह्याचा वयोगटनिहाय विजेता संघ/खेळाडूस उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. खेळाडूं सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth CertificateMark Sheet of Previous year Examination  याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना द्यावात, अशी विनंती आहे.