Monday 24 February 2014

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलतीचे वाढीव गुण

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलतीचे वाढीव गुण मिळण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव सादर करताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिलेला विहीत नमुन्यातील अर्ज, खेळाडूचे प्रमाणपत्र व हॉल तिकीटाची सत्यप्रत मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह संबंधित शाळेमार्फत दि. २० मार्च, २०१४ पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. शासकीय स्पर्धा (शालेय, महिला व ग्रामीण) स्पर्धा तसेच मान्यताप्राप्त संघटनेच्या खेळांचे प्रस्ताव स्वतंत्र सादर करावेत. 

 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. ३० नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार सन २०१२-१३ पासून उपरोक्त परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, त्यांना उत्तीर्ण होण्याच्या किमान मर्यादेपर्यंत क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात येतील. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अटींच्या अधीन राहून क्रीडा सवलतीचे वाढीव गुण अनुज्ञेय राहतील याची सर्व शाळाप्रमुख, शारीरिक शिक्षण शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.  अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा;

Monday 17 February 2014

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजने अंतर्गत  तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी देण्यात येतो. या पुरस्कारासाठी गत तीन वर्षाची खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली जाईल. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक असुन, त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानामध्ये इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे.

तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०१३-१४ नामांकनाचे प्रस्ताव दिनांक २५ फेब्रुवारी २०१४ अखेर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत.

राज्यस्तर / जिल्हास्तर युवा पुरस्कार २०१३-१४.

राज्यातील / जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळावे; यासाठी राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यास संदर्भिय शासन निर्णय़ान्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
            सन २०१३-१४ या वर्षाच्या पुरस्काराकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
१.     जिल्हास्तर युवा पुरस्कार :- जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. सदर पुरस्काराचे अर्ज विहित नमुण्यात भरुन माहे फेब्रुवारी २०१४ अखेर जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत.
२.     राज्यस्तर युवा पुरस्कार :- राज्यस्तरावर पुरस्कारकरिता निवड करताना क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार युवक / युवती एक तसेच नोंदणीकृत संस्था एक यांना पुरस्कार देण्यात येईल. सदर पुरस्काराचे अर्ज विहित नमुण्यात भरुन माहे एप्रिल २०१४ अखेर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवती इमारत, पुणे-४११००१ या पत्त्यावर मागविण्यात येत आहेत.

जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कार संबंधी अधिक माहितीसाठी व लाभार्थींनी करावयाचा नमुना अर्ज प्रपत्र अ व ब क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच क्रीडा  व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे किंवा विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.