Monday 24 August 2015

जिल्हास्तर जवाहरलाल नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा, २०१५-१६

           जिल्हा क्रीडा परिपषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर जवाहरलाल नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धेचे दि. २२ ते २४ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
            सदर स्पर्धेचे उद्‍घाटन मा. श्री. रमेश शानभाग, संस्थापक, के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा यांच्या शुभहस्ते व मा. सौ. रेखा गायकवाड, प्राचार्या, मा. श्री. हितेंद्र खरात, राज्य हॉकी क्रीडा मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेकरिता सातारा जिल्ह्यातून मुला-मुलींचे एकूण १८ संघ उपस्थित होते. या स्पर्धेतून विजयी झालेले संघांची सांगली येथे होणा-या कोल्हापूर विभागीय जवाहरलाल नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :-
15 वर्षाखालील मुले :-
विजयी संघ :- मुधोजी हायस्कूल, फलटण (२:०)
उपविजयी संघ :- के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा.
तृतीय :- महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा.
17 वर्षाखालील मुले :
विजयी संघ :- मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण  (३:२)
उपविजयी संघ :- सैनिक स्कूल, सातारा.
तृतीय :- मुधोजी हायस्कूल, फलटण, सातारा.
17 वर्षाखालील मुली :-
विजयी संघ :- मुधोजी हायस्कूल, फलटण (३:२)
उपविजयी संघ :- श्री. शिवाजीराजे इंग्लिश मिडी. स्कूल, फलटण.
तृतीय :- के.एस.डी. शानभाग विद्यालय, सातारा.

            या स्पर्धेकरिता श्री. अक्षय फरकुटे, श्री. सादिकअली बागवान, श्री. शंतनू जाधव, श्री. अनिकेत खाडे, श्री. कौस्तुभ बाबर, श्री. यश सुर्वे, श्री. अनिकेत आडागळे, श्री. कांबळे, श्री. आदित्य सपकाळ, श्री. अक्षय भोईटे, श्री. रुपेश त्रिंबके, श्री. आकाश धबधबे व श्री. सागर कारंडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Friday 21 August 2015

जिल्हास्तर शालेय व ग्रामिण तायक्वांदो क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा

 जिल्हास्तर शालेय व ग्रामिण तायक्वांदो स्पर्धेच्या सुधारीत तारखा
जिल्हास्तर शालेय व ग्रामिण ताय़क्वांदो क्रीडा स्पर्धा २०१५-१६
          जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय व महिला तायक्वांदो क्रीडा स्पर्धेच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.
जिल्हास्तर शालेय व ग्रामिण तायक्वांदो स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अ.क्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
          स्पर्धा ठिकाण
१.
ताय़क्वांदो
१६ वर्षा खालील मुले व मुली
०२ सप्टेंबर, २०१५
श्री श्री भगवंतराव विद्या व ज्युनि.कॉलेज,औंध, ता.खटाव, जिल्हा सातारा
२.
१४ वर्षाखालील मुले व
१९ वर्षा खालील मुली
०३ सप्टेंबर, २०१५
१७ वर्षाखालील मुले व मुली
०४ सप्टेंबर,२०१५
१४ वर्षाखालील मुली व
१९ वर्षा खालील मुले
०५ सप्टेंबर,२०१५


          कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस, क्रीडा अधिकारी यांच्याशी  ८२७५२०६८७९ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Thursday 20 August 2015

वाई तालुकास्तर खो खो स्पर्धा कार्यक्रमात बदल

वाई तालुकास्तर खो-खो स्पर्धा कार्यक्रमात बदल

वाई तालुकास्तर शालेय खो खो स्पर्धा कार्यक्रमात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
१. नियोजित कार्यक्रम : २६ ते २८ ऑगस्ट, २०१५.
 सुधारीत कार्यक्रम : १ सप्टेंबर १४, १७,१९ मुले
                               २ सप्टेंबर १४,१७,१९ मुली                                                                            
  

जिल्हास्तर शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धां २०१५-१६ च्या तारखांमध्ये बदल

जिल्हास्तर शालेय व महिला टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०१५-१६
         जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय व महिला टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय व महिला टेबल टेनिस स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अ.क्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
टेबल टेनिस
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व महिला
०७ सप्टेंबर, २०१५
अनंत इंग्लीश स्कुल, सातारा
२.
१४,१७,१९वर्षाखालील मुली
०८ सप्टेंबर, २०१५

          कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस, क्रीडा अधिकारी यांच्याशी  ८२७५२०६८७९ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.
pan>या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Monday 17 August 2015

सायकलींग, तायक्वांदो, चायक्वांदो, किक बॉक्सिंग या खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्थगित करणेबाबत

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार विविध स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते. सदर स्पर्धांचे आयोजन संबंधित खेळांच्या एकविध संघटनांच्या तांत्रिक सहकार्यातून करण्यात येते.

            तथापि सायकलिंग, तायक्वांदो, चायक्वांदो, किकबॉक्सिंग या खेळांच्या राज्यस्तरावर दोन समांतर संघटना कार्यरत असून त्यापैकी अधिकृत संघटनेबाबत संचालनालयामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. त्याकरिता काही कालावधीची आवश्यकता असल्याने उपरोक्त नमूद खेळांच्या जिल्हास्तर शालेय स्पर्धा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.

Wednesday 12 August 2015

जिल्हास्तर शालेय व महिला बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०१५-१६ च्या तारखांमध्ये बदल

जिल्हास्तर शालेय व महिला बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०१५-१६
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय व महिला बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय व महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
बॅडमिंटन
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०९ सप्टेंबर, २०१५
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुली व महिला
१० सप्टेंबर, २०१५

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्रीमती मनिषा पाटील, क्रीडा अधिकारी यांच्याशी  ७५८८४६१६८८ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

माण तालुकास्तर शालेय व ग्रामीण व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल


माण तालुकास्तर शालेय व ग्रामीण व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २०१५-१६
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या माण तालुकास्तर शालेय व ग्रामीण व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
माण तालुकास्तर शालेय व ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
व्हॉलीबॉल
१४,१७ वर्षाखालील मुले व मुली
२० ऑगस्ट, २०१५
प. म. शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी ता. माण
२.
१६,१९ वर्षाखालील मुले व मुली
२१ ऑगस्ट, २०१५

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. लोहकरे एम. स्पर्धा आयोजक यांच्याशी ९९२३२१२४०६  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Friday 7 August 2015

कबड्‍डी,खो-खो,कुस्ती,व्हॉलीबॉल व मैदानी खेळाच्या उद्‍बोधन वर्गाचे आयोजन


कराड तालुकास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात बदल

कराड तालुकास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात बदल

अ.क्र.
खेळ
स्पर्धा स्तर
नियोजित दिनांक
सुधारित दिनांक
१.
कबड्डी
तालुकास्तर शालेय स्पर्धा
१४ वर्षे मुले व मुली – २० ऑगस्ट,२०१५
१४ वर्षे मुले – १९ ऑगस्ट, २०१५
२.
१७ वर्षे मुले व मुली – २१ ऑगस्ट, २०१५
१४ वर्षे मुली, १९ वर्षे मुले व मुली -   २० ऑगस्ट, २०१५
३.
१९ वर्षे मुले व मुली – २२ ऑगस्ट, २०१५
१७ वर्षे मुले – २१ ऑगस्ट, २०१५
४.
१७ वर्षे मुली – २२ ऑगस्ट, २०१५

Wednesday 5 August 2015

खंडाळा तालुकास्तर कुस्ती स्पर्धांच्या तारखांत बदल

खंडाळा तालुकास्तर शालेय व ग्रामीण कुस्ती स्पर्धा बदल
.
.


अ.क्र.
खेळस्पर्धा स्तरनियोजित दिनांकसुधारीत दिनांक 
१.
कुस्ती
खंडाळा तालुका
६ ते ७ ऑगस्ट, २०१५
१७ ऑगस्ट, २०१५
-  १४,१७,१९ वर्षे मुले
१९ ऑगस्ट, २०१५
- १६ वर्षे (ग्रामीण) मुले व मुली,१९ वर्षे मुली

जिल्हास्तर शालेय फूटबॉल (१४ वर्षाखालील मुले) क्रीडा स्पर्धा २०१५-१६ भाग्यपत्रिका

टीप : १४ वर्षाखालील गटात इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या खेळाडू/विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही.







Tuesday 4 August 2015

राष्ट्रीय युवा पुरस्कार २०१४-१५.


विषयः राष्ट्रीय युवा पुरस्कार- २०१4-१5 करिता
प्रस्ताव सादर करणेबाबत...
         
केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, युवा कल्याण विभाग यांच्यामार्फत सन २०१4-१5 या वर्षाकरिता राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १३ ते ३५ वयोगटातील युवक, युवती व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. युवकांच्या विकासासाठी कार्य करणा-या युवक-युवती तसेच स्वयंसेवी संस्था यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष संपर्क साधून अथवा www.yas.nic.in या संकेतस्थळास भेट देऊन विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावा व परिपूर्ण प्रस्ताव  दि. ७ ऑगस्ट, २०१५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा.

Monday 3 August 2015

खटाव तालुकास्तर शालेय कुस्ती स्पर्धेंच्या तारखात बदल

अ.क्र
वयोगट
पुर्वीची तारीख
बदल झालेली तारखा
ठिकाण व संपर्क क्रमांक
१.
१४ व १९ वर्षा खालील मुले
०५ ऑगस्ट २०१५
०८ ऑगस्ट २०१५
भारत माता विद्यालय ,मायणी ता.खटाव जि.सातारा
संपर्क:श्री श्रीमंत कोकरे मो.क्र ७०८३५८२६४६,९४२१२१३१५४