Monday 23 November 2015

Run For Justice, Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करण्याबाबत...

            Run For Justice, Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करण्याबाबत.

भारताच्या संविधान मूल्यांच्या वर्धनासाठी देशातील शाळांमध्ये संविधान दिवस दि. २६.११.२०१५ रोजी साजरा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. राज्यातील शाळांमध्ये १४ वर्षाखालील मुलांसाठी ५ किमी. पेक्षा कमी व १४ वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ९ कि.मी.पेक्षा कमी अंतरासाठी एकता दौडच्या धर्तीवर Run for Justice Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करावयाचे आहे. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना कॅप्स/टी शर्टस देण्यात यावे, असे नमूद केले आहे. सदर ठिकाणी संविधानाच्या प्रस्तावनेतील शपथ विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे.

         या अनुषंगाने आपल्या शाळेत Run for Justice Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करुम त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करावा.

                                                                                                           जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा.    

Tuesday 3 November 2015

शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धा, सन २०१५-१६.

           शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धा, सन २०१५-१६.
 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांचे वतीने आणि सातारा जिल्हा कराटे डो असो.सातारा यांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्यातून खालील कालावधीत शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित खेळाडू व शाळा / कनिष्ट महाविद्याल्यांनी यांची नोंद घ्यावी.
जिल्हास्तर कार्यक्रम खालील प्रमाणे :-
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
१४,१७ व १९ वर्षे मुले व मुली
9 नोव्हेंबर, २०१५ सकाळी ०९:३० वा.
०9 नोव्हेंबर, २०१५
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ,सातारा.
श्री. संतोष मोहिते, (संघटना प्रतिनीधी ) ७७४१८११८७२,
श्री निकाळजे अनिल
(संघटना प्रतिनीधी )
८८८८३१११०६ .

वजन गट खालील प्रमाणे  :-
१४ वर्षे मुले : -२०,-२५,-३०,-३५,-४०,-४५,-५०,-५५,-६०,+६०.
 मुली :-१८,-२२,-२६,-३०,-३४,-३८,-४२,-४६,-५०,+५०.
१७ वर्षे मुले :-३५,-४०,-४५,-५०,-५५,-६०,-६५,-७०,+७०.,
मुली :-३२,-३६,-४०,-४४,-४८,-५२,-५६,-६०,+६०.
१९ वर्षे मुले :-४५,-५०,-५५,-६०,-६५,-७०,+७०.,                                                                                              मुली :--४०,-४४,-४८,-५२,-५६,-६०,+६०.

                    अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ,सातारा येथे संपर्क करावा