Saturday 16 July 2016

माणदेश मॅरेथॉन स्पर्धेची बैठक


फलटण तालुक्याच्या बैठक दिनांकामध्ये बदल

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रीडा परिषद सातारा मार्फत सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करणे या कार्यक्रमांतर्गत तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

            सन २०१६-१७ या वर्षातील तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत फलटण तालुक्याची बैठक दिनांक १८ जुलै, २०१६ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करण्यात आलेली होती. परंतु सदर दिवशी बेंदूर सणामुळे व शारिरीक शिक्षण शिक्षक संघटनेच्या विनंतीवरुन, सदर बैठक दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे.