Tuesday 30 April 2013

जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१२


जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१२
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शिछपु-२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२, दि.०१ ऑक्टोबर, २०१२ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप रोख ` १०,०००/-, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे, दरवर्षी अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला), यांना पुरस्कार प्रदान करण्यात यावा, याशिवाय अ) एशियन गेम्स, ब) कॉमनवेल्थ गेम्स क) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, ड) राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा व इ) युथ ऑलिम्पिक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात यावा, असा पुरस्कार ज्यादाचा पुरस्कार समजण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद आहे.
या वर्षी पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून डॉ.रामास्वामी एन, जिल्हाधिकारी, सातारा तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त श्री.सुजित शेडगे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी, श्री.संजय बोडरे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी, श्री.नरेंद्र देसाई, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, व उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या निवड समितीने सन २०१२ च्या गुणवंत खेळाडू, व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारार्थींची निवड केलेली आहे. सन २०१२ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-
गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष प्रवर्ग):
१) आदित्य हणमंत अहिरे, (मल्लखांब) :

२८ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक विजेतेपद, पोल प्रकारात द्वितीय व वैयक्तिक प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केलेला खेळाडू याशिवाय विविध राज्य व राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक प्रकारात सहभागी होऊन पदक संपादन केलेले आहेत, जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला प्रवर्ग):
१) पूजा रामदास चव्हाण (मल्लखांब) :

२३ वी व २४ व्या या दोन्ही कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत दोरीचा मल्लखांब प्रकारात सुवर्ण पदक व सांघिक प्रकारात सुवर्ण पदक. याशिवाय ५७ व्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक प्रकारात विजेतेपद मिळविणारी गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
१) श्रीमती सायराबानू जावेद शेख (कबड्डी)  :

सातारा जिल्ह्यातील रुबीना हरुण शेख, सायली रमेश कचरे, सोनाली घोरपडे, स्वप्नाली मुळे यासारख्या वरिष्ठ, कनिष्ठ व शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन पदक संपादन केलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शक. याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यस्तरावर खेळणारे खेळाडू मार्गदर्शन घेत असतात. मार्गदर्शनाबरोबरच विविध तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा आयोजक व पंच म्हणून सहभाग असतो.