क्रीडा संकुल नियमावली

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, सातारा
संकुलातील सुविधा वापराची नियमावली
  • नियमावलीस श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल वापराची नियमावली असे संबोधण्यात यावे.
  • या नियमावलीची अंमलबजावणी दि. १५.०४.२००८ पासून पुढील आदेश होईपर्यंत असेल.
संक्षिप्त व्याख्या :
१.         नियमावली      -           म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल वापराची नियमावली
२.         क्रीडा समिती   -           म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, सातारा
३.         समिती अध्यक्ष             -           म्हणजे जिल्हाधिकारी, सातारा तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा
                                    संकुल कार्यकारी समिती, सातारा
४.         समिती सचिव  -           म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा तथा सदस्य सचिव,
                                    जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, सातारा
५.         समिती             -           शासन निर्णय क्र. राक्रीधो/२००३/प्र.क्र.११/क्रीयुसे-१, दि.२६ मार्च,२००३
अन्वये गठीत समिती.
                                                अध्यक्ष               -           मा. जिल्हाधिकारी, सातारा
                                                सदस्य               -           मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., सातारा
                                                सदस्य               -           मा. जिल्हा पोलिस अधीक्षक, सातारा
                                                सदस्य               -           मा. मुख्याधिकारी, न. प., सातारा
                                                सदस्य               -           मा. कार्यकारी अभियंता, सा. बां. वि., सातारा
                                                सदस्य               -           मा. उपसंचालक, क्री. यु. से., कोल्हापूर
                                                सदस्य               -           मा. जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
                                                सदस्य               -           मा. शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प., सातारा
                                                सदस्य               -           मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प., सातारा
                                                सदस्य सचिव     -           मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा
६.         समितीचे कार्य व अधिकार -
६.१      जिल्हा क्रीडा संकुल, साताराचे व्यवस्थापन, जिल्ह्यामधे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा
            निर्माण करण्याचे नियोजन करणे.
६.२      जिल्हा क्रीडा विकास निधी उभारणे व व्यवस्थापन करणे.
६.३      जिल्हा क्रीडा निधी संकलित करणे.
६.४      जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्पांतर्गत नवीन क्रीडावषयक सुविधा निर्माण करणे. निर्माण करण्यात आलेल्या
            क्रीडा सुविधांची देखभाल-दुरुस्ती आणि व्यवस्थापन करणे.
६.५      कोणताही नवीन नियम तयार करण्याचा किंवा आधीच्या नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, सातारा राखून ठेवत आहे.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीद्वारा सुविधा वापराची सर्वसाधारण व सुविधा निहाय नियमावली पुढील प्रमाणे राहील.


श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
सुविधा वापराची नियमावली ( सर्वसाधारण नियम )
नियम क्र.१
ज्या संस्थेस किंवा व्यक्तीस क्रीडा संकुलाचा उपयोग करावयाचा असेल त्या संस्थेस समितीने विहीत केलेल्या नमुन्यात व विहीत केलेले शुल्क आगाऊ भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांचेकडे अर्ज करुन आवश्यक सुविधा आरक्षित कराव्या लागतील.
नियम क्र.२
एखाद्या बाबीकरिता आरक्षण करुन घेतल्यानंतर तशाच प्रकारचे आरक्षण जर दरवर्षी हवे असेल आणि दुस-या संस्थांचे आरक्षण नसेल तर सुविधा उपलब्ध करुन देता येईल. या पूर्वी आरक्षण केले होते या बाबींचा विचार केला जाणार नाही. तसा आग्रह करण्याचा अधिकार कोणत्याही संस्थेस असणार नाही. जे प्रथम आरक्षण करतील त्यांच्या आरक्षणाचा प्रथमतः विचार केला जाईल. याबाबत अति महत्त्वाच्या काही बाबींचा विचार करता त्यामधे बदल करण्याचा अधिकार समितीस राहील.
नियम क्र.३
सुविधांच्या उपलब्धतेनुसार सदस्य सचिव आरक्षणाबाबत निर्णय घेतील व तसे संबंधितास कळविण्यात येईल. समितीने निश्चीत केलेले सुविधांचे भाडे व अनामत रक्कम पूर्णपणे भरल्यानंतरच सुविधांचे आरक्षण केले जाईल.
नियम क्र.४
सुविधा आरक्षणाचा अर्ज जास्तीत जास्त एक महिने अगोदर स्विकारला जाईल.
नियम क्र.५
सुविधांचे केलेले आरक्षण रद्द करावयाचे झाल्यास अर्जदारास लेखी कळविणे बंधनकारक असून आरक्षण रद्द केल्यानंतर अनामत रक्कमेचा परतावा खालीलप्रमाणे करण्यात येईल.

अ. क्र.
आरक्षण रद्द करण्याचा कालावधी
अनामत रकमेचा परतावा
आरक्षित कालावधीच्या १५ दिवस अगोदर
पूर्ण १००ऽ रक्कम
आरक्षित कालावधीच्या ७ दिवस अगोदर
५०ऽ रक्कम
आरक्षित कालावधीच्या ४ दिवस अगोदर
२५ऽ रक्कम
आरक्षित कालावधीच्या २ दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत
० (शून्य)

नियम क्र.६
संकुलातील कोणतीही सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.
नियम क्र.७
संकुलामध्ये स्पर्धा / शिबीराचे आयोजन करताना किंवा सराव करताना साहित्याची किंवा इतर कोणत्याही वस्तूची मोडतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी. संकुलातील कोणत्याही बाबीची मोडतोड झाल्यास, कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधितांकडून त्याची नुकसान भरपाई करण्यात येऊन नोंदणी व इतर शुल्क जप्त करण्यात येईल.
नियम क्र.८
संकुलात येताना कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, त्या हरविल्यास अथवा चोरीस गेल्यास त्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीवर राहणार नाही.
नियम क्र.९
संकुलातील सुविधांचा वापर करताना एखाद्याची जीवित अथवा वित्त हानी झाल्यास जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती जबाबदार राहणार नाही.
नियम क्र.१०
संकुल परिसरात मादक द्रव्य घेण्यास, धुम्रपान करण्यास, गुटखा-पान तत्सम वस्तू सेवन करण्यास सक्त मनाई आहे असे आढळून आल्यास संकुल परिसरात येण्यास मज्जाव करुन आरक्षण शुल्क जप्त करुन मुंबई पोलीस अधिनियम १०५१ अन्वये कलम ११६ व ११७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नियम क्र.११
संकुलामधे विविध स्पर्धा पाहण्याकरिता येणा-या नागरिकांना संकुल परिसरात मादक द्रव्य घेण्यास, धुम्रपान करण्यास, गुटखा-पान तत्सम वस्तू सेवन करणा-या सक्त मनाई आहे. तसे आढळून आल्यास संबंधित नागरिकास मुंबई पोलीस अधिनियम १०५१ अन्वये कलम ११६ व ११७ ऩुसार कायदेशीर कारवाई करण्यात येऊन संकुल परिसरात प्रवेश करण्यास कायमस्वरुपी मज्जाव करण्यात येईल.
नियम क्र.१२
संकुलातील सुविधांचा वापर करताना शिस्तीचे पालन करावे लागेल, शिस्तभंग केल्यास अथवा मैदानात भांडण करुन अशांतता निर्माण केल्यास संबंधितांचे आरक्षण रद्द करण्यात येऊन त्याचे सुविधा वापराचे संपूर्ण शुल्क जप्त करण्यात येईल.
नियम क्र.१३
संकुलात विविध कार्यक्रमाचे आयोजन करताना कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील, उद्‌घाटन व समारोप समारंभास उपस्थित राहणा-या पाहुण्यांचा तपशील प्रत्यक्ष कार्यक्रमापूर्वी चार दिवस अगोदर या कार्यालयास लेखी कळविणे बंधनकारक राहील.
नियम क्र.१४
संकुलामध्ये सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी नोंदणी शुल्क रु. ५०/- आणि ओळखपत्र खर्च रक्कम रु. २०/- आकारण्यात येईल व सदर कालावधी १ एप्रिल ते ३१ मार्च असा राहील. ज्येष्ठ (६०वर्षांवरील) नागरिकांना ही सुविधा विनामूल्य राहील. मात्र ओळखपत्राकरिता येणारा खर्च रु. २०/- सचिवांकडे जमा करुन ओळखपत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक राहील.
नियम क्र.१५
संकुलाची वेळ सकाळी ५.३० ते रात्री ७.३० अशी राहील, फक्त बहुउद्देशीय हॉल रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील. फक्त समिती अध्यक्षांचे आदेशान्वये आणि मान्यतेनेच या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकेल.
नियम क्र.१६
संकुलामध्ये सरावासाठी येणा-या व्यक्तींना आवश्यक क्रीडा साहित्य स्वतःचे आणावे लागेल.
नियम क्र.१७
संकुलामध्ये व परिसरात पाळीव प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे.
नियम क्र.१८
संकुलामध्ये व परिसरात संकुल समितीद्वारे दिलेले ओळखपत्र दररोज बरोबर असणे बंधनकारक आहे. ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारण्यात येईल.
नियम क्र.१९
संकुलामध्ये सर्व सभासदांनी आपल्या मोटार, मोटार सायकल, सायकल,इ.वाहने समितीने निश्चीत केलेल्या पार्किंगच्या जागेतच लावणे बंधनकारक राहील.
नियम क्र.२०
सभासदाने ज्या खेळाच्या सुविधा आरक्षित केलेल्या आहेत फक्त त्याचाच वापर करावा, इतर कोणत्याही बाबींचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधिताचे आरक्षण रद्द करण्यात येईल.
नियम क्र.२१
सरावास येणा-यांना प्रतिदिन सराव कालावधी व्यतिरिक्त १ तास जादाचा मानण्यात येईल. पैकी पहिला १/२ तास पूर्व तयारी आणि सरावा नंतरचा १/२ तास रिलॅक्सेशन करिता गृहित धरला जाईल.
नियम क्र.२२
संकुलामध्ये शासकीय / निमशासकीय स्पर्धा, संघटनेच्या अथवा इतर संस्थांच्यावतीने  तालुका/ जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या व शिबीराच्या आयोजनाकरिता प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच संकुलातील सुविधा पूर्वसूचनेने बंद ठेवण्याचा अधिकार समितीने राखून ठेवलेला आहे.
नियम क्र.२३
संकुलात सभासदत्त्व स्विकारताना वैद्यकीय प्रमाणपत्र व जिवीत हानीबाबतचे हमीपत्र तसेच संकुल समितीने तयार केलेले नियम मान्य असल्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल.
नियम क्र.२४
संकुलामधे स्वच्छता ठेवण्याची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असणार आहे.इतस्ततः थुंकणे,   भिंतीवर लिहीणे,इ. गैरवर्तन करताना आढळून आल्यास संबंधित संस्थेमार्फत किंवा व्यक्तीमार्फत रु. ५००/- दंड आकारण्यात येईल आरक्षण रद्द करुन सदस्यत्त्व रद्द करण्यात येऊन शुल्क जप्त केले जाईल. अशाप्रकारे दंड करण्याचे अधिकार समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना असतील.
नियम क्र.२५
ज्या शाळांना खेळाच्या सरावासाठी आरक्षण करावयाचे असेल अशा शाळांकडून शुल्क भरुन मैदान सुविधा उपलब्ध करुन देता येईल. ज्या शाळेत मागणी केलेल्या सुविधा उपलब्ध आहेत अशा विद्यालयांचा विचार आरक्षण करतेवेळी केला जाणार नाही.
नियम क्र.२६
सभासदांना सुविधांच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याबाबत समितीच्या कार्यालयात लेखी तक्रार द्यावी, विनाकारण मैदान सेवक अथवा इतर कर्मचा-यांशी वाद घालू नये. कर्मचा-यांशी वर्तणूक चांगली असणे अपेक्षित आहे.
नियम क्र.२७
संकुल वापराच्या अनुषंगाने समितीने वेळोवेळी तयार केलेले नियम सर्व सभासदांना बंधनकारक राहतील व ते माहीत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित सभासदाची राहील.
नियम क्र.२८
संकुलामध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचे अथवा नाकारण्याबाबतचे सर्व अधिकार समितीने राखून ठेवलेले आहेत.
नियम क्र.२९
शाळा/संस्था/संघटना यांचे ज्या क्रीडाप्रकारासाठी आरक्षण असेल त्याठिकाणी विद्यार्थी/खेळाडूं-बरोबर त्यांचे क्रीडाशिक्षक / प्रशिक्षक असणे बंधनकारक राहील अन्यथा त्या शाळेच्या खेळाडूंना आवारात  प्रवेश नाकारला जाईल.
नियम क्र.३०
शाळेच्या / संस्थेच्या प्रत्येक खेऴाडूचे ओळखपत्र कार्यालयातून करुन घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची / क्रीडा शिक्षक अथवा प्रशिक्षकाची राहील.
नियम क्र.३१
शाळा / संस्था / संघटना यांनी सरावासाठी आणलेल्या साहित्याची जबाबदारी संबंधितांची राहील. तसेच त्यांच्या साहित्याची देखभाल आणि ठेवण्याची व्यवस्था संकुलामधे केली जाणार नाही.
नियम क्र.३२
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जे प्रशिक्षक उपलब्ध आहेत त्या क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी शाळांच्या / संस्थांच्या वैयक्तिक आरक्षणाचा विचार केला जाणार नाही. प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना उपलब्ध प्रशिक्षकाकडे सरावाकरिता पाठविणे बंधनकारक राहील.
नियम क्र.३३
अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या संस्थेस किंवा व्यक्तीस क्रीडा  सुविधा उपलब्धतेबाबत पूर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकार समिती अध्यक्ष, सचिव तसेच समितीला असतील.
नियम क्र.३४
जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधा व मैदाने शुल्क आकारुन वापरावयास देताना राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना सुविधा देता येणार नाही. तसेच क्रीडा संकुलाची निगा, देखभाल करण्यासाठी क्रीडा स्पर्धा व्यतिरिक्त शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनाच समितीचे मान्यतेने शुल्क भरुन देता येईल.
नियम क्र.३५
नोंदणी अर्जात नमूद केलेल्या व्यक्तीनांच क्रीडा संकुलाचा उपयोग करता येईल. सोबत आणलेल्या इतर व्यक्तींना संकुलाचा वापर करावयाचा असल्यास सचिवांची मान्यता घेऊन योग्य शुल्क अदा केलेनंतरच सुविधेचा वापर करता येईल.
नियम क्र.३६
खाण्या-पिण्याचे कुठलेही पदार्थ क्रीडा संकुलाचे आवारात घेऊन आल्यास टाकाऊ पदार्थांमुळे अस्वच्छता निर्माण होणार नाही याची दक्षता व्यक्तिशः घेणे आवश्यक आहे.
नियम क्र.३७
संकुलातील जलतरण तलाव आणि सर्व बहु-उद्देशीय हॉल प्रत्येक आठवड्यात एक दिवसाकरिता बंद राहतील.
नियम क्र.३९
उपरोक्त नियमावलीत बदल करण्याचे अंतिम अधिकार जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, सातारा स्वतःकडे राखून ठेवत आहे.

००००००





श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
सुविधा वापराची नियमावली ( सुविधा निहाय नियम )
अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम वापरासाठी नियमावली :
नियम क्र.४०
सरावासाठी येणा-या सर्व सभासदांना सरावास आवश्यक साहित्य स्वतःचे आणणे बंधनकारक राहील.
नियम क्र.४१
मैदानावर सरावासाठी शूजशिवाय परवानगी देण्यात येणार नाही.
नियम क्र.४२
संकुलात सराव करताना संबंधित खेळाच्या संघटनेने निश्चीत केलेला गणवेश व सुरक्षा साधने वापरणे प्रत्येक सभासदास बंधनकारक राहील.
नियम क्र.४३
फेकीच्या व उड्यांच्या बाबींचा सराव करताना इतरांना इजा होणार नाही. याची काळजी संबंधितांनी घेणे बंधनकारक राहील.
नियम क्र.४४
सभासदांना स्टेडियम प्रवेशाचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याचे वेगळे शुल्क रक्कम रु. २०/- आकारण्यात येईल.
नियम क्र.४५
विद्युत झोतात स्पर्धा आयोजित करण्यात येत असेल तर विद्युत बिलाचा सर्व खर्च संबंधित आयोजकास करावा लागेल. याकरिता डिपॉझिट म्हणून रक्कम रु. २०,०००/- जमा करावे लागेल. स्पर्धा संपल्यानंतर प्रत्यक्ष खर्च वजा करुन डिपॉझिटमधील शिल्लक रक्कम परत केली जाईल.
नियम क्र.४६
क्रीडा संकुलातील उपलब्ध टिकाऊ साहित्याचा वापर करावयाचा झाल्यास त्याकरिता वेगळे शुल्क द्यावे लागेल. वेगवेगळ्या साहित्यांचे शुल्काचे आकारणी दर प्रतिवर्षी समितीचे वार्षिक सभेत निश्चीत करण्यात येतील.
नियम क्र.४७
मैदानांवर सरावाकरिता २ तास वेळ उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामधे सुरुवातीचा अर्धा तास खेळाचे वर्मिंग-अप्‌ करिता, १ तास प्रत्यक्ष सरावाकरिता आणि नंतरचा अर्धा तास कुलिंग- डाऊन करिता समजण्यात येईल. त्यानंतर मैदान सोडावे लागेल.
नियम क्र.४८
ट्रॅकवर, ट्रॅकचे आतील बाजूस खोदकाम करता येणार नाही. ट्रॅकचे बाहेरील बाजूस लांब उडी, तिहेरी उडीची मैदाने असल्याने आणि शासकीय क्रिकेट स्पर्धा आयोजनाकरिता चार धावांकरिताची अंतिम रेषा असल्याने या भागातही खोदकाम करता येणार नाही.

बहु-उद्देशीय हॉल वापरासाठी नियमावली :
नियम क्र.४९
वुडन फ्लोअरिंग चा वापर करताना रबर शूजचा वापर करावा. लेदर शूज, चप्पल घालून वुडन फ्लोअरिंगवर जाण्यास परवानगी नाकारण्यात येईल.
नियम क्र.५०
सभासदास आरक्षण दिलेल्या कोर्टवर व दिलेल्या वेळेतच सराव करणे बंधनकारक राहील.
नियम क्र.५१
आरक्षण करताना सर्व सभासदांची नोंदणी करणे बंधनकारक राहील. त्यात बदल करावयाचा झाल्यास संकुल समितीच्या सचिवांची परवानगी घेणे अनिवार्य राहील.
नियम क्र.५२
सभासदांनी वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावे.
नियम क्र.५३
सरावासाठी येणा-या सर्व सभासदांना आवश्यक साहित्य स्वतःचे आणणे बंधनकारक राहील.
नियम क्र.५४
संकुलात सराव करताना संबंधित खेळाच्या संघटनेने निश्चीत केलेला गणवेश व सुरक्षा साधने वापरणे सभासदास बंधनकारक राहील.
नियम क्र.५५
सभासदांना हॉल प्रवेशाचा पास दाखविल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
नियम क्र.५६
नेहमीच्या सभासदांशिवाय अन्य व्यक्तीस सरावासाठी आणले असल्यास संबंधितास एक तास सरावाचे शुल्क भरुनच पावती पाहून सरावास परवानगी दिली जाईल.
नियम क्र.५७
कोणत्याही बाबीचे आरक्षण तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता असणार नाही. अशा प्रकारच्या आरक्षणाकरिता रु. ५,०००/- अनामत रक्कम भरावी लागेल. यापुढील महिन्या- करिता आरक्षण करावयाचे असल्यास पुनःश्च कार्यवाही करावी लागेल. (उदा. तायक्वांदो, कराटे, योगा, ज्युदो, वुशु, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, इ. क्लासेस करिता)
नियम क्र.५८
सर्व बहु-उद्देशीय हॉल आठवड्यातून एक दिवस बंद राहतील.
नियम क्र.५९
क्लासेसकरिता येणा-या सर्व खेळाडूंकडे जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीद्‌वारे देण्यात येणारे ओळखपत्र असणे बंधनकारक राहील. त्याचे वेगळे शुल्क रक्कम रु. २०/- आकारण्यात येईल.
नियम क्र.६०
वुडन फ्लोअरिंगवर सरावास जाताना सोबत कोणतेही खाद्य पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे.
जलतरण तलाव वापरासाठी नियमावली :
नियम क्र.६१
जलतरण तलावात पोहण्यासाठी प्रवेश देताना संबंधितांना ५० मी. पोहण्याची चाचणी देणे व वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
नियम क्र.६२
जलतरण तलावात प्रवेश करणेपूर्वी शॉवर घेणे बंधनकारक राहील.
नियम क्र.६३
शिकाऊ सदस्यांसाठी वेगळी बॅच तयार करण्यात येईल तथापी शिकाऊ सभासदांचे प्रतिमाह रु. २००/- ज्यादा शुल्क आकारण्यात येईल.
नियम क्र.६४
पोहण्यासाठी येणा-या व्यक्तिंनी स्विमिंग कॉस्ट्युम आणि (महिलांना) कॅप वापरणे बंधनकारक राहील.
नियम क्र.६५
डायव्हिंग बोर्डवरुन उड्या मारण्यासाठी जलतरण तलावाचे जीव-रक्षकांना सूचीत करणे बंधनकारक राहील.
नियम क्र.६६
साबण अथवा शरीरास तेल लावून तलावातील पाण्यामध्ये प्रवेश करण्यास सक्त मनाई राहील.
नियम क्र.६७
सभासदांना जलतरण तलावाचा पास दाखविल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
नियम क्र.६८
आठवड़्यातून जलतरण तलावाचे स्वच्छता आणि सफाईकरिता तलाव एक दिवस पूर्ण बंद ठेवण्यात येईल.
नियम क्र.६९
सभासदास ह्रदयरोग, फिटस्‌, इ. सारखे आजार असतील तर त्याबाबत पूर्व कल्पना सचिवांना आणि तलावावरील जीव संरक्षकास लिखीत स्वरुपात देणे बंधनकारक राहील.
नियम क्र.७०
जलतरण तलावामधे विना आरक्षण पोहण्यास येणा-यांकरिता रु. २५/- प्रतितास पावती फाडून सुविधा प्राप्त करुन घेता येईल. मात्र ही सुविधा शिकाऊ पोहणा-यांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.

जिम वापरासाठी नियमावली :
नियम क्र.७१
सभासदांना जिम प्रवेश पास दाखविल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
नियम क्र.७२
व्यायाम करणा-या सभासदांना आवश्यक गणवेश व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक राहील.
नियम क्र.७३
व्यायामपटूंनी वापरलेले साहित्य संबंधित जागेवर व्यवस्थित ठेवणे बंधनकारक राहील.
नियम क्र.७४
व्यायामपटूंनी वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावे.
नियम क्र.७५
साहित्याचे नुकसान होणार नाही याची सर्व सभासदांनी दक्षता घेणे बंधनकारक राहील, साहित्याचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण रक्कम संबंधित सभासदाकडून वसूल करण्यात येईल.
विविध खेळांची खुली मैदाने वापरासाठी नियमावली :
नियम क्र.७६
संबंधित मैदानावर सराव करणे बंधनकारक राहील.
नियम क्र.७७
मैदानावर अथवा मैदानांचे आजूबाजूला खोदकाम करता येणार नाही.
नियम क्र.७८
सरावासाठी येणा-या सर्व सभासदांना आवश्यक साहित्य स्वतःचे आणणे बंधनकारक राहील.
नियम क्र.७९
सराव करणा-या सभासदांना आवश्यक गणवेश व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक राहील.
नियम क्र.८०
सराव करताना इतर सभासदांना त्रास अथवा व्यत्यय येणार नाही याची खबरदारी संबंधित सभासदांनी घेणे बंधनकारक राहील.
नियम क्र.८१
सभासदांनी वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावे.
नियम क्र.८२
मैदानावर प्रवेश पास दाखविल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
नियम क्र.८३
सरावासाठी आणलेल्या साहित्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सभासदांची राहील. तसेच संकुलामधे साहित्य ठेवणेकरिता कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही.
नियम क्र.८४
कोणत्याही मैदानावर खोदकाम करता येणार नाही.
नियम क्र.८५
मैदानांवर सरावाकरिता २ तास वेळ उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामधे सुरुवातीचा अर्धा तास खेळाचे वॉर्मिंग-अप करिता, १ तास प्रत्यक्ष सरावाकरिता आणि नंतरचा अर्धा तास कुलिंग- डाऊन करिता समजण्यात येईल. त्यानंतर मैदान सोडावे लागेल.
वसतिगृह वापरासाठी नियमावली :
नियम क्र.८६
वसतिगृहाची सुविधा क्रीडा विषयक उपक्रमांकरिताच उपलब्ध राहील.
नियम क्र.८७
शासकीय शालेय,ग्रामीण,महिला क्रीडा स्पर्धेकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध राहील.
नियम क्र.८८
वसतिगृह आरक्षित करणा-या खेळाडू / प्रशिक्षक यांनी वसतिगृहाचा वापर करताना कोणत्याही साहित्याची मोडतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, साहित्याची मोडतोड झाल्यास झालेल्या नुकसानीची वसुली संबंधितांकडून करण्यात येईल.
नियम क्र.८९
वसतिगृहातील दिवे दिवसा चालू ठेवू नयेत तसेच खोली बंद करुन बाहेर पडताना पंखे व इतर विजेची उपकरणे बंद करणे बंधनकारक राहील.
नियम क्र.९०
वसतिगृहामध्ये स्वच्छता ठेवणे बंधनकारक राहील.
नियम क्र.९१
झोपताना वसतिगृहातील सर्व दिवे रात्री ९.३० नंतर बंद करणे बंधनकारक राहील.
नियम क्र.९२
वसतिगृहामध्ये मादक द्रव्य घेण्यास, धुम्रपान करण्यास, गुटखा-पान तत्सम वस्तू सेवन करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास संकुल परिसरात येण्यास मज्जाव करुन आरक्षण शुल्क जप्त करण्यात येऊन मुंबई पोलीस अधिनियम १०५१ अन्वये कलम ११६ व ११७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येऊन वसतिगृह सोडावे लागेल.
नियम क्र.९३
वसतिगृहामध्ये मोठ्याने ओरडणे, गोंधळ करणे, किंचाळणे, इ. बाबीस सक्त मनाई आहे.
नियम क्र.९४
वसतिगृह सोडताना खोल्यांच्या चाव्या संबंधित कर्मचा-यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.
नियम क्र.९५
महिला/मुली खेऴाडूंचे वसतिगृहामधे पुरुष/मुले खेळाडू/संघव्यवस्थापक यांना प्रवेश निषीद्घ आहे, अशाप्रकारचे वर्तन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नियम क्र.९६
वसतिगृहाचा चेक आऊट टाईम स. ०८.०० असा राहील. मात्र क्रीडा स्पर्धेकरिता आलेल्या खेळाडूंना स्पर्धा संपल्यानंतर दुस-या दिवशी त्यांचे रेल्वेचे वेळापत्रकानुसार अथवा वाहनाचे आरक्षणानुसार ही वेळ शिथीलक्षम राहील. ही वेळ तीन तासांपेक्षा अधिक झाल्यास अर्ध्या दिवसाचे भाडे आकारण्यात येईल.
नियम क्र.९७
वसतिगृहात राहणेकरिता रु. ५००/- अनामत रक्कम भरावी लागेल.

००००००

No comments:

Post a Comment