Thursday, 27 September 2018

                             

                          जिल्हास्तरिय शालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धा २०१८-१९
    जिल्हास्तरिय शालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धांचे आयोजन दि.२९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी के.एस.डी.शानभाग विद्यालय सातारा येथे करण्यात आलेले आहे.दि.२९ सप्टेंबर रोजी १४,१७,१९, वर्षाखाली मुले व मुली गटाच्या पिस्तल प्रकारातील स्पर्धा व दि.३०सप्टेंबर रोजी रायफ़ल प्रकारातील स्पर्धा घेण्यात येतील.त्यानुसार सर्व शाळांनी आपले संघ स्पर्धेदिवशी सकाळी ९ वाजता उपस्थीत ठेवावेत.अधिक माहितीसाठी श्रीमती स्नेहल जगताप, क्रीडा अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

Wednesday, 29 August 2018

जिल्हास्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा, २०१८-१९

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर शालेय (१७, १९ वर्षाखालील मुले व मुली ) स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक ३० ऑगस्ट, २०१८ रोजी सातारा ऑफीसर्स क्लब, सातारा येथे करण्यात आलेले असून, स्पर्धेच्या बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत
श्री. राजेंद्र अतनुर, क्रीडा अधिकारी, ९१७५८३२४३४

Friday, 6 April 2018

१० वी व १२ वी ग्रेसगुण खेळाडू यादी


शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळलेल्या ज्या खेळाडूंनी ग्रेसगुण मिळण्याकरिता प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दाखल केलेला आहे अशा सर्व खेळांडूनी आपल्या नावाचा समावेश असल्याची खात्री करुन घ्यावी व नाव नसल्यास कार्यालयशी त्वरित संपर्क साधावा अथवा ज्या खेळाडूंनी अद्याप ग्रेसगुण प्रस्ताव सादर केलेले नसतील त्यांनी प्रस्ताव दोन दिवसामध्ये सादर करावेत. 























Friday, 13 October 2017

जिल्हास्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्‍चित

जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय खालील क्रीडा स्पर्धेच्या तारखा निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत.
अक्र
खेळ
वयोगट
स्पर्धा  दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
स्क्वॅश
सर्व
१६ ऑक्टोंबर, २०१७
(सकाळी ११:००वा.)
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. धारुरकर, ८२७५२०६८७९
टिप : सर्व खेळाडूंनी स्पर्धेकरिता आवश्यक असणारे सर्व साहित्य स्वतः घेऊन यावे.

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.
प्रति,
१. मा. संपादक,
दै. --------------
२. मा. जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा.

           
उपरोक्त वृत्तपत्र टिप्पणीस आपल्या लोकप्रिय दैनिकात विनामूल्य प्रसिध्द करावी, अशी विनंती आहे.

       
जिल्हा क्रीडा अधिकारी,

          सातारा.

Tuesday, 10 October 2017

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांच्या तारखांंमध्ये बदल


जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा,२०१७-१८ च्या तारखांमध्ये बदल
            जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय खालील क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
डॉजबॉल
१७,१९ वर्षे मुले व मुली
१३ ऑक्टोंबर, २०१७
मालोजीराजे विद्यालय व ज्युनि. कॉलेज, लोणंद ता. खंडाळा
श्री. तिरमके, ९४२३२६५३९९
२.
स्क्वॉय मार्शल आर्ट
१४,१७,१९ वर्षे मुले व मुली
14 ऑक्टोंबर, २०१७
अक्षता मंगल कार्यालय, वडुज ता. खटाव
श्री. कावडे, ९४२३२६५१८८


कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.