Thursday, 27 June 2013

व्यायाम साहित्य पुरवठा निविदा सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा.
व्यायाम साहित्य पुरवठा निविदा सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा हे स्थानिक विकास निधींतर्गत असलेल्या कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून त्यांच्याकडे प्राप्त होणार्‍या संभाव्य निधीतून व्यायाम साहित्य पुरवठा दरकरार करण्यासाठी सीलबंद निविदा मागवित आहेत. या कामाच्या कोर्‍या निविदांचा संच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा-४१५००१ (दूरध्वनी क्रमांक-०२१६२-२३७४३८) याठिकाणी दि.२४/०६/२०१३ ते दि.०८/०७/२०१३ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध असतील. कोर्‍या निविदा संचाच्या मागणीसाठी पुरवठादारांनी नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडून व नापरतावा निविदा शुल्क रू.५००/- (रोख अथवा डी.डी.) भरणा करुन प्राप्त करुन घेता येतील.
निविदा भरुन सादर करण्याची अंतिम तारीख दि.१२/०७/२०१३  रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत राहील. तद्‌नंतर आलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त निविदा शक्य झाल्यास त्याच दिवशी सायंकाळी ०४.०० वाजता उघडण्यात येतील.
अ.क्र.
कामाचा तपशील
अंदाजित रक्कम वार्षिक
निविदा शुल्क (ना-परतावा)
कंत्राटदार तपशील
१.
सातारा जिल्ह्यात स्थानिक विकास निधींतर्गत अथवा इतर योजनांतर्गत व्यायाम व इतर उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी दरकरार करणे
निधी उपलब्धते
नुसार
रु.५००/-

सुरक्षा ठेव : रु.१०,०००/-
व्यायामसाहित्य तयार करणे व पुरवठा करणे. याबाबीचा अधिकृत पुरवठादार
कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारणे अथवा नाकारणेचा सर्व अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा  हे राखून ठेवीत आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी,
सातारा.
क्र.स्थाविका/व्याशासा/निविदा/(१)/१३-१४/

००००००

Wednesday, 1 May 2013

जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१२ वितरण सोहळा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शिछपु-२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२, दि.०१ ऑक्टोबर, २०१२ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील श्रीमती सायराबानू जावेद शेख (कबड्डी), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व आदित्य हणमंत अहिरे, (मल्लखांब) व पूजा रामदास चव्हाण (मल्लखांब) या गुणवंत खेळाडूंना मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री सातारा यांच्या हस्ते ०१ मे महाराष्ट्र दिनी प्रदान करण्यात आला, या प्रसंगी श्रीमती अरुणादेवी पिसाळ, अध्यक्षा, जि.प.सातारा.  डॉ.रामास्वामी एन., जिल्हाधिकारी, सातारा, श्री अभिजीत बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.सातारा, श्री. के.एम.एम.प्रसन्ना, पोलीस अधीक्षक, सातारा यांची उपस्थिती होती.

पुरस्कार वितरण सोहळ्याची क्षणचित्रे :





Tuesday, 30 April 2013

जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१२


जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१२
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शिछपु-२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२, दि.०१ ऑक्टोबर, २०१२ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप रोख ` १०,०००/-, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे, दरवर्षी अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला), यांना पुरस्कार प्रदान करण्यात यावा, याशिवाय अ) एशियन गेम्स, ब) कॉमनवेल्थ गेम्स क) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, ड) राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा व इ) युथ ऑलिम्पिक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात यावा, असा पुरस्कार ज्यादाचा पुरस्कार समजण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद आहे.
या वर्षी पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून डॉ.रामास्वामी एन, जिल्हाधिकारी, सातारा तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त श्री.सुजित शेडगे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी, श्री.संजय बोडरे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी, श्री.नरेंद्र देसाई, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, व उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या निवड समितीने सन २०१२ च्या गुणवंत खेळाडू, व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारार्थींची निवड केलेली आहे. सन २०१२ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-
गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष प्रवर्ग):
१) आदित्य हणमंत अहिरे, (मल्लखांब) :

२८ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक विजेतेपद, पोल प्रकारात द्वितीय व वैयक्तिक प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केलेला खेळाडू याशिवाय विविध राज्य व राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक प्रकारात सहभागी होऊन पदक संपादन केलेले आहेत, जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला प्रवर्ग):
१) पूजा रामदास चव्हाण (मल्लखांब) :

२३ वी व २४ व्या या दोन्ही कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत दोरीचा मल्लखांब प्रकारात सुवर्ण पदक व सांघिक प्रकारात सुवर्ण पदक. याशिवाय ५७ व्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक प्रकारात विजेतेपद मिळविणारी गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
१) श्रीमती सायराबानू जावेद शेख (कबड्डी)  :

सातारा जिल्ह्यातील रुबीना हरुण शेख, सायली रमेश कचरे, सोनाली घोरपडे, स्वप्नाली मुळे यासारख्या वरिष्ठ, कनिष्ठ व शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन पदक संपादन केलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शक. याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यस्तरावर खेळणारे खेळाडू मार्गदर्शन घेत असतात. मार्गदर्शनाबरोबरच विविध तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा आयोजक व पंच म्हणून सहभाग असतो.