Wednesday, 24 June 2015

संघटना बैठक ०४ जुलै, २०१५

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा द्वारा सन २०१५-१६ मध्ये आयोजित होणा-या शालेय विना-अनुदानित खेळांच्या संघटनांची बैठक दि. ०४ जुलै, २०१५ रोजी दुपारी ०२:३० वा. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी संबंधित संघटनांनी याची नोंद घ्यावी

Monday, 22 June 2015

राज्य युवा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १० दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

राज्य युवा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १० दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण-२०१२ दि. १४ जून, २०१२ च्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील युवक कल्याण क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने युवकांमधील नेतृत्व गुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिलेली असून त्याकरिता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी या ठिकाणी राज्य युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे.
या प्रशिक्षण केंद्राच्या वतीने युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने दि. १० मार्च ते १९ मार्च, २०१५ या कालावधीत १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले  आहे. या प्रशिक्षण शिबीरांमध्ये २२ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांना विविध जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबीराकरिता प्रत्येक जिल्ह्यातून दोन युवक व एक युवती यांची निवड केली जाणार आहे.
या शिबीरामध्ये वयाची अट पूर्ण करणारे नेहरु युवा कर्मी (NYC), राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS)  २ कॅम्प पूर्ण केलेले विद्यार्थी,  राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी (NCC), एम. ए. (सायकॉलॉजी, सोशियॉलॉजी ) चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा मंडळे यांच्याकडून सामाजिक कार्यात रस घेणारे युवक युवती  सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शासनाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रांतर्गत होणा-या आगामी प्रशिक्षण शिबीरांकरिता सहभागी होण्यास इच्छूक युवक युवतींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा या ठिकाणी प्रत्यक्ष अथवा ०२१६२-२२३७४३८ या दुरध्वनीद्वारे संपर्क साधावा.

Friday, 15 May 2015

बॅडमिंटन सभासदत्व



श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे बॅडमिंटन हॉलमधील वूडन फ्लोअरींग करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या कामाचा लोकापर्ण सोहळा मा.पालकमंत्री महोदयांच्या हस्ते दि.०१ मे, २०१५ रोजी संपन्न झालेला आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने चार बॅडमिंटन कोर्टस्‌ उपलब्ध झालेले असून, हे सर्व कोर्टस्‌ खेळण्याकरिता बॅडमिंटन खेळाडू, नागरिक, जिल्हा बॅडमिंटन संघटना यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
बॅडमिंटन खेळासाठी सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते १० या कालावधीत प्रत्येकी एका तासाच्या बॅचेस करण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या सभासदांना प्राधान्याने नव्याने सभासदत्व देण्यात येणार आहे.
बॅडमिंटन खेळासाठी सभासदत्व शुल्क ८ व्यक्तींसाठी प्रति कोर्ट प्रति माह रु.१०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार फक्त) ठेवण्यात आलेले आहे. तसेच शालेय खेळाडूंसाठी प्रति खेळाडू  एक तासासाठी रु.१,०००/- (अक्षरी रु.एक हजार फक्त) इतके शुल्क आकारण्यात येत आहे.
उपरोक्त प्रमाणे आरक्षण शुल्क भरणा करुन, आपले सभासदत्व निश्चित करण्यात यावे,.

दरांचा तक्ता खालीलप्रमाणे :



रु.१०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार फक्त)प्रति आठ सभासदांसाठी
रु.१,०००/- (रु.एक हजार  फक्त) प्रति खेळाडू
मासिक