Saturday, 16 July 2016
फलटण तालुक्याच्या बैठक दिनांकामध्ये बदल
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व
क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रीडा परिषद सातारा मार्फत सन २०१६-१७ या शैक्षणिक
वर्षात विविध खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक
कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करणे या कार्यक्रमांतर्गत तालुका, जिल्हा व विभागीय
क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
सन २०१६-१७ या वर्षातील तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत फलटण तालुक्याची बैठक दिनांक १८ जुलै,
२०१६ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करण्यात आलेली होती. परंतु सदर दिवशी
बेंदूर सणामुळे व शारिरीक शिक्षण शिक्षक संघटनेच्या विनंतीवरुन, सदर बैठक दिनांक
१९ जुलै, २०१६ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर
बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे.
Wednesday, 29 June 2016
Subscribe to:
Posts (Atom)



