Tuesday, 2 December 2014

राज्यस्तर शालेय सेपक-टकरा स्पर्धा, २०१४-१५.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व सातारा सेपक-टकरा असो.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय सेपक-टकरा (१९ वर्षाखालील मुले व मुली ) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. ०७ ते ०८ डिसेंबर, २०१४ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या ०८ विभागामधून किमान १५० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

            सदर स्पर्धेमधून राष्ट्रीय शालेय सेपक-टकरा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा मुला व मुलींचा संघ निवडला जाणार आहे. या राज्यस्तर शालेय सेपक-टकरा स्पर्धेचे उद्‍घाटन दि. ०७ डिसेंबर, २०१४ रोजी दुपारी होणार आहे.  

राज्यस्तर शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, २०१४-१५.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व टेनिस बॉल क्रिकेट असो. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय टेनिस बॉल क्रिकेट (१९ वर्षाखालील मुले व मुली ) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. ०७ ते ०८ डिसेंबर, २०१४ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या ०८ विभागामधून किमान ३५० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

            सदर स्पर्धेमधून राष्ट्रीय शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा मुला व मुलींचा संघ निवडला जाणार आहे. या राज्यस्तर शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन दि. ०७ डिसेंबर, २०१४ रोजी दुपारी होणार आहे.  

Monday, 1 December 2014

शालेय जिल्हास्तर बेल्ट रेसलींग क्रीडा स्पर्धा च्या ठिकाणात बदला बाबत 2014-15


                जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा द्वारा दि.०५/१२/२०१४ रोजी आयोजीत करण्यात येणा-या शालेय जिल्हास्तर बेल्ट रेसलींग क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणात प्रशासकीय कारणास्तव खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.तरी संबंधीत शाळा व कनिष्ट महाविद्यालयांनी आणि खेळाडू विद्यार्थांनी यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी ०२१६२-२३७४३८ या क्रमांकावर  किवा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले आहे.
स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे


.क्र
स्पर्धा दिनांक
बदल झालेले स्पर्धा ठिकाण
संपर्क क्रमांक
दि.०५/१२/२०१४ रोजी सकाळी ९:३० वाजता
श्री शिवाजी आखाडा,कराड.
श्री गणेश पवार मो.क्र. ८४८४८४८११८ /             
                             ७७४४९४८६३१,
श्री अमोल साठे मो.क्र. ९९२२६३६७८२.